Wednesday, June 26, 2024

लग्नाच्या बातम्यांमधेच अथिया शेट्टी आणि केएल राहुलने घेतले नवीन घर, महिन्याचे भाडे ऐकून सरकेल पायाखालची जमीन

सध्या बॉलिवूडच्या लग्नाच्या चर्चा ऐकू येत आहे. वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री मौनी रॉय, त्यानंतर फरहान अख्तरने आपल्या पार्टनरसोबत लग्नगाठ बांधली. अलीकडेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही एकमेकांचे कायमचे बनले आहेत. दरम्यान, अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असते. फिल्मस्टार सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टी लवकरच क्रिकेटर केएल राहुल लवकरच लग्न करत असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान आता त्यांच्याबद्दल एक नवीन बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे त्यांच्या राहत्या घराची.

https://www.instagram.com/p/Cce2L6QBVrf/?utm_source=ig_web_copy_link

अथिया आणि केएल राहुलने एकत्र राहण्यासाठी भाड्याचे घर घेतले आहे. अथिया आणि केएल राहुल कार्टर रोड अपार्टमेंटमधील ८ व्या मजल्यावरील 4BHK अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत असल्याची माहिती आहे. जे सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. रिपोर्टनुसार, या अपार्टमेंटचे भाडे महिन्याला 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

सुनील शेट्टी हे मंगळुरूच्या तुलु भाषिक कुटुंबातील आहेत. दुसरीकडे, केएल राहुल देखील मंगळुरूचा आहे. अशा परिस्थितीत दोघेही दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न करू शकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व बातम्यांना अद्यापपर्यंत दोन्ही कुटुंबांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा