Monday, July 15, 2024

ठरलं तर! ‘या’ ठिकाणी होणार केएल राहुल आणि आथियाचा शाही विवाह सोहळा

अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (K.L Rahul) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. आता एक रिपोर्ट समोर आला आहे की अथिया आणि राहुलच्या लग्नाचा दिवस जवळ आला आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, लग्नासाठी डेस्टिनेशनही निवडण्यात आले आहे. अथिया आणि राहुलने गेल्या वर्षी त्यांचे नाते सार्वजनिक केले आणि तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुक आहेत.

वास्तविक, पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की अथिया आणि राहुलने मुंबईतील 5-स्टार हॉटेलऐवजी खंडाळा येथील सुनील शेट्टीचा ‘जहाँ’ हा बंगला त्यांच्या लग्नाचे ठिकाण म्हणून निवडला आहे.

केएल राहुलच्या कामाचे वेळापत्रक लक्षात घेऊन लग्नाची तारीख निश्चित केली जाईल. लग्नाच्या एका प्रसिद्ध आयोजकाने खंडाळ्याला भेट दिली आहे. अथिया आणि राहुलच्या लग्नाची चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये. याआधीही त्यांच्या लग्नाच्या आणि तारखेच्या बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या महिन्यातही अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.

सुनील शेट्टीने इंस्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “केएल राहुल आणि अथिया शेट्टीने ठरवताच लग्न होईल. तो म्हणाला, “मुलांनी ठरवल्याबरोबर मला वाटते. राहुलचे वेळापत्रक आहे. सध्या आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूर आहे. मुलांना ब्रेक मिळाला की मग लग्न होईल. एका दिवसात लग्न होऊ शकत नाही?” त्यामुळेच आता या शाही विवाह सोहळ्याची त्यांच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा- काळ आला होता पण वेळ आली नव्हती! भीषण अपघातातून वाचलेत ‘हे’ कलाकार
गायक नाहीतर ‘हे’ होते हार्डी संधूचे स्वप्न, एका अपघाताने बदलला निर्णय
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाला दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा,18 वेबसाईटवर घातली बंदी

हे देखील वाचा