Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड मालेगावात ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या शो दरम्यान चाहत्यांनी फोडले फटाके, थेअटरात लागली आग

मालेगावात ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या शो दरम्यान चाहत्यांनी फोडले फटाके, थेअटरात लागली आग

बॉलिवूडमधले तीन खान म्हणजे चित्रपट हिट होण्याची २०० टक्के खात्री असते. या तिन्ही खान मंडळींचा आपला एक चाहता वर्ग आहे. या इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठ्या नावाजलेल्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी या तिघांना सिनेमात एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र हे तिघं अजूनपर्यंत एकदाही एकाच सिनेमात एकत्र दिसले नाहीत. मात्र यात एक चांगली गोष्ट म्हणजे जरी हे तिघे एकत्र आले नसले तरी, सलमान-शाहरुख आणि सलमान-आमिर हे दोघे एका सिनेमात एकत्र आले होते.

बॉलिवूडच्या खान त्रिकुटापैकी सलमान खान आणि शाहरुख खान यांचा १९९५ साली आलेला ‘करण अर्जुन’ हा सिनेमा प्रचंड सुपरहिट झाला होता. प्रदर्शनाच्या २५ वर्षांनी देखील या सिनेमाची क्रेझ कमी झाली नाहीये. कोरोनामुळे सरकारच्या नियमावलीनुसार चित्रपटगृह चालू तर झाले, मात्र अजून पाहिजे तसे सिनेमे प्रदर्शित होत नाहीये. म्हणूनच अनेक शहरातील चित्रपटगृहाच्या मालकांनी जुने चित्रपट लावून गेल्या वर्षभराची नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशातच मालेगावमधील एका चित्रपटगृहांमध्ये सलमान खान, शाहरुख खानचा ‘करण अर्जुन’ सिनेमा लावण्यात आला होता. आता ह्या दोघांचा सिनेमा इतक्या वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार या विचाराने या दोघांच्याही फॅन्समध्ये उत्साह संचारला होता. म्हणूनच फॅन्स लपून छापून चित्रपटगृहांमध्ये फटाके घेऊन गेले. सिनेमा सुरु होताच त्यांनी चित्रपटगृहातच फटाके फोडायला सुरुवात केली, आणि त्याच दरम्यान फटाक्यांमुळे तेथील खुर्च्यांना आग लागली आणि बघता बघता अर्ध्याहून अधिक चित्रपटगृह आगीच्या चपेटात आले होते, परंतु लगेच अग्निशामक दलाला पाचारण केल्यामुळे ही आग आटोक्यात आली.

यात जीवितहानी झाली नसली तरी चित्रपटगृहचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना १२ फेब्रुवारीला घडली. या चित्रपटगृहाच्या मालिक शेख शफिक यांनी सांगितले की, ” कधी कधी लोकांचा उत्साह आम्हाला खूपच महागात पडतो. ही घडलेली घटना पहिलीच नाहीये, याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. यात एक चांगली गोष्ट म्हणजे, आग लवकर विझल्याने नुकसान काहीशे कमी झाले आहेत.”

हे देखील वाचा