Monday, July 1, 2024

‘अ‍ॅनिमल’मधील ‘जमाल जमालो कुडू’ गाण्याची नारकर जोडप्याला भूरळ; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

रणबीर कपूरच्या प्रमुख भूमिकेतील ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील गाणीही विशेष लोकप्रिय झाली आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाणं ‘जमाल जमालो कुडू’. या गाण्यावर आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अविनाश व ऐश्वर्या नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे.

अविनाश व ऐश्वर्या (Aishwarya Narkar)सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध गाण्यांवर डान्स करून ते त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करतात. या दोघांचा फिटनेसही त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा देणारा आहे. ऐश्वर्या नारकर यांच लाखो चाहते आहेत. त्यांच्या व्हिडिओवर नेटकरी लाईक आणि कमेंट करत असतात. अनेकदा ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल देखील केले जाते.

नुकतंच, अविनाश व ऐश्वर्या नारकरांनी ‘जमाल जमालो कुडू’ गाण्यावर अभिनेत्री अश्विनी कासारसह जबरदस्त डान्स (Aishwarya Narkar dance video) केला आहे. त्यांची ही रिल इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला अवघ्या तासांतच 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. या व्हिडीओमध्ये तिघांनीही हुबेहूब स्टेप्स केल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अनेकांनी अविनाश नारकर यांच्या फिटनेसची विशेष प्रशंसा केली आहे. एका युजरने लिहिलं, “अविनाश साहेब, आदर्श फिटनेस!” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्स स्टेप्स एकदम परफेक्ट आहेत.” या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या जोडप्याला भविष्यातही अशा प्रकारच्या व्हिडिओ पोस्ट करण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashwini Kasar (@ashwinikasar18)

अविनाश व ऐश्वर्या नारकर हे मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय जोडी आहे. ते दोघेही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. ऐश्वर्या नारकर यांनी अनेक मालिकेत काम केले आहे. लेक माझी लाडकी, या सुखानो या, स्वामिनी, श्रीमंता घरची सून अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Avinash and Aishwarya Narkar dance video on the song Jamal Jamalo Kudu from Animal goes viral)

आधिक वाचा-
तैमूरचा स्वॅगच निराळा! परफॉर्मेंस करताना दिसला ‘बेबो’चा मोठा मुलगा, करीनाने शेअर केला व्हिडिओ
‘बोल्ड आणि बिनधास्त’ क्रितीचं ग्लॅमरस फोटोशूट, अतरंगी पोझेसने चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

हे देखील वाचा