Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मला तुमच्या लग्नाला बोलवा…’, स्नेहाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे रंगली आविष्कारच्या लग्नाची चर्चा

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून या आठवड्यात आविष्कार दार्व्हेकरचा प्रवास संपला आहे. घरात येताच त्याच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. अनेक मालिका आणि चित्रपटातून झळकलेल्या या अभिनेत्याला ‘बिग बॉस’च्या घरात पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. मात्र, घरात आल्यावर त्याचा वावर आणि कार्यातील सहभाग अगदी कमी होता. याचे कारण कदाचित हे देखील असू शकते की, त्याची पूर्व पत्नी स्नेहा वाघ ही देखील घरात आली होती. सुरुवातीला स्नेहाने या घरात एन्ट्री घेतली, परंतु जशी आविष्काची एन्ट्री झाली जसे तिच्या चेहऱ्यावरील रंग उडाले.

‘बिग बॉस’च्या पहिल्या एपिसोडपासून ही जोडी खूप चर्चेत होती. त्यांच्या लग्नाची अनेकांना काहीच कल्पना नव्हती, परंतु घरात आल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती समोर आली. अवघ्या १८ व्या वर्षी स्नेहा आणि आविष्कार यांनी प्रेमविवाह केला होता, परंतु स्नेहाने त्याच्यावर शारीरिक मारहानीचा आरोप लावला होता. त्यानंतर ते दोघे वेगळे झाले. तसेच, स्नेहाने दुसरे लग्न देखील केले होते, परंतु ते लग्न देखील टिकले नाही आणि तिने दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला. घरात आल्यानंतर त्यांनी अनेकवेळा बोलता-बोलता या गोष्टीचा खुलासा केला होता. परंतु घरात त्यांच्यात पुन्हा एकदा मैत्रीचे नाते तयार झाले होते. (Avishkar darvhekar evicted from bigg Boss Marathi 3, his ex wife says, invite me in your wedding)

या वेळी इलिमिनेशच्या वेळी डेंजर झोनमध्ये नेमके आविष्कार आणि स्नेहा राहिले होते. त्या दोघांपैकी एकाचा प्रवास थांबणार होता, तेव्हा आविष्कारने सांगितले की, “आम्हाला दोघांना पण राहायचे आहे.” त्यावेळी मांजरेकर सांगतात की, “आविष्कारचा प्रवास इथेच थांबला आहे.” यानंतर आविष्कार घरातील सगळ्यांना भेटतो, परंतु जेव्हा तो स्नेहाला भेटतो, तेव्हा तिच्या तोंडून काही शब्द ऐकून सगळेच हैराण झाले. ती आविष्कारला म्हणाली की, “मला तुमच्या लग्नाला बोलवा, मी नक्की येईल.”

या नंतर सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न येऊन गेले. तसेच तिने जाताना त्याला सांगितले की, “मला तुमच्याही थोडं बोलायचं आहे. या घरात आले तेव्हा तुम्हाला बघून मला खूप राग आला होता. मला या घरात राहण्याची इच्छा नव्हती, पण तुमचा बदललेला स्वभाव बघून मला आनंद झाला. आपल्यात थोडी मैत्री निर्माण झाली आणि मला वाटतं बाहेर जाऊन ती मैत्री तशीच असावी.” यावर आविष्कार देखील तिला “हो नक्कीच,” असे उत्तर देतो.

यानंतर ती त्याला तब्येतीची काळजी घ्या, असे सांगते आणि बाय म्हणते. त्यांच्या या संभाषणानंतर आविष्कार पुन्हा एकदा लग्न करणार आहे का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सात आठवडे आमच्या जीवावर काढले’, भांडणादरम्यान जयने मीराला मारला टोमणा

-उत्कर्षने जवळच्या मित्राला केले थेट नॉमिनेट, चिडलेला जय म्हणाला, ‘मी आता कोणासाठी काहीही…’

-जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा

-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी

हे देखील वाचा