टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री असणारी अवनीत कौर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. बालकालाकरापासून सुरू झालेला अवनीतचा प्रवास आता बॉलिवूड अभिनेत्रींपर्यंत येऊन पोहचला आहे. फक्त टीव्ही, चित्रपट नाही तर सोशल मीडियावरही अवनीतचा मोठा दबदबा आहे. तिला इंस्टग्रामवर २६.२ मिलियन फॉलोवर्स आहे. अवनीतने एका डान्स रियॅलिटी शोमध्ये भाग घेत या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर ती अनेक जाहिरातींमध्ये दिसली. पुढे तिने बालकलाकार म्हणून अनेक मालिकांमध्ये काम केले.
आज अवनीतने तिच्या अभिनयाने, तिच्या डान्सने, तिच्या एक्सप्रेशनने आणि तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावले आहे. लवकरच अवनीत कंगना रानौतच्या ‘टिकू वेड्स शेरू’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जेव्हा अवनीतच्या पहिल्या सिनेमाची बातमी आली त्यानंतर अवनीत सतत प्रकाशझोतात आहे. एक उत्तम अभिनेत्रीसोबतच, उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर असणाऱ्या अवनीतने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अवनीतने तिच्या सुरूवातीच्या प्रवासापासून आतापर्यंत अनेक क्षणांना स्थान दिले आहे.
अवनीतने ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या शोमध्ये सहभाग घेतला होत्या त्यानंतर २०१० सालापासून वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षांपासून तिच्या अभिनयचा प्रवास चालू झाला. ११ वर्षांमध्ये अवनीतने तिच्या मेहनतीने आणि संघर्षाने डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेत्री, बालकलाकार अशा अनेक भूमिका साकारत आज बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्रींचे स्थान मिळवले आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चनही दिसत असून तो काहीतरी बोलत आहे.
अभिषेक बच्चन अवनीत कौरला तेव्हा भेटला होता, जेव्हा अवनीत डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टरच्या सेटवर आली होती, तेव्हा अभिषेक तिला म्हणाला होता की, “कोरिओग्राफीचे मला काही माहित नाही मात्र मला तुझे एक्सप्रेशन खूपच आवडले. मी आता घरी जाऊन ऐश्वर्याला सांगणार आहे की, पुढच्या १० वर्षात तुला जोरदार टक्कर द्यायला कोणी तरी येणार आहे.” २०१४ साली अवनीतने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिने मर्दानी, ‘करीब करीब सिंगल’, ‘मर्दानी 2’ आदी चित्रपट तर अनेक वेबसिरीज आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. या व्हिडिओमध्ये अवनीत भावुक झालेली दिसली.
कंगना रानौतने देखील अवनीतचे कौतुक केले आहे. अवनीत कौरचा एक व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले होते की, अवनीत तू तुझ्या मोठ्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर इथपर्यंत पोहचली आहे. तुला शोधून मी खूप खुश आहे. एक दिवस मला तुला टॉपची अभिनेत्री म्हणून बघायचे आहे.”
‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये अवनीत कौर, नवाजुद्दीन सिद्धकीच्या सोबत दिसणार आहे. हा चित्रपट कंगना तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत निर्माण करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…