Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड तर ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘ब्रह्मास्त्र ३’ अयान मुखर्जीने पोस्ट शेअर करत दिली माहिती

तर ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘ब्रह्मास्त्र ३’ अयान मुखर्जीने पोस्ट शेअर करत दिली माहिती

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा २०२२ साली आलेल्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ हा सिनेमा चांगलाच गाजला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली. सिनेमा रिलीज झाला गाजला, तरीही तो या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. तब्बल १० वर्षांनी हा सिनेमा प्रदर्शित केला गेला होता. हा भाग पाहून प्रेक्षकांना ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र पार्ट 3’ या सिनेमांबद्दल अधिकच उत्सुकता निर्माण झाली. सिनेमाचे दोन भाग येणार हे आधीपासूनच सर्वांना माहित आहे. अशातच आता दिग्दर्शक अयान मुखर्जीने या दोन भागांच्या प्रदर्शनाबद्दल महतवाची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

अयान मुखर्जीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या सिक्वलची माहिती देताना सांगितले की दोन्ही भागांची शूटिंग सोबतच होईल, मात्र दोन्ही चित्रपटांना वेगवेगळ्या तारखांना प्रदर्शित केले जाणार आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले की, आमच्या चित्रपटाच्या पहिल्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता या सिनेमाच्या यशानंतर मी माझे पूर्ण लक्ष सिनेमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागावर केंद्रित केले आहे. मला माहित आहे की, लोकांची आता आमच्या या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. अशातच आता आम्ही ठरवले आहे की, दोन्ही चित्रपटाची शूटिंग एकत्र होईल. मात्र सिनेमे वेगवेगळ्या दिवशी प्रदर्शित केले जाणार आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाचा दुसरा भाग डिसेंबर २०२६ आणि तिसरा भाग डिसेंबर २०२७ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.”

सिनेमाच्या पहिल्या भागात शिवाची कथा दाखवण्यात आली होती, मात्र दुसऱ्या भागात सिनेमाची कथा ‘देव’वर आधारित असेल. मात्र अयानने तिसऱ्या भागाच्या कहाणीबद्दल काहीच खुलासा केला नाही. दरम्यान ब्रह्मास्त्र सिनेमाने १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. रणबीर आणि आलियाच्या अभिनयाने सिनेमाला चार चांद लागले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मग जा पाकिस्तानला’ म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटला नेटकऱ्यांचे सणसणीत उत्तर

राम चरण अन् व्यंकटेशसोबत सलमान नाचला लुंगी डान्सवर; चाहते म्हणाले,’साँग ऑफ द इयर’

हे देखील वाचा