Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

भिकाऱ्यांना अन्न देण्यासाठी भिकारी बनून जायचा सलमान; अभिनेत्री म्हणाली, ‘मुंबईच्या रस्त्यांवर…’

बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान हा केवळ सुपरस्टार अभिनेताच नाही, तर तो मनाने देखील सुपरस्टार आहे. सलमान खान अनेकदा गरीब आणि गरजू लोकांना मदत करताना दिसतो. गरजू लोकांच्या मदतीसाठी तो नेहमीच धावून येताे. आता या लाेकप्रिय अभिनेत्याबाबत एक खास खुलासा करण्यात आला की,सलमान खान सुपरस्टार म्हणून नाही, तर भिकाऱ्यांच्या रुपात जाऊन भिकाऱ्यांना अन्न दान करत असे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान संवाद साधताना आयशा जुल्का (Ayesha Jhulka)हिने अनेक खुलासे केले. त्यादरम्यान तिने ‘कुर्बान’ या डेब्यू चित्रपटाशी संबंधित अनेक आठवणी शेअर केल्या. या चित्रपटात आयशा झुल्कासोबत सलमान खान (Salman Khan ) मुख्य भूमिकेत होता. अभिनेत्री आयशा म्हणाली की, “कुर्बान चित्रपटाच्या सेटवर सर्वांसाठी जेवण यायचे. अनेक वेळा अन्न वाया जायचे किंवा उष्टे रहायचे. अशा परिस्थितीत सलमान खान शूटिंग संपल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर भिकाऱ्यांना उरलेले अन्न द्यायचा.”

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, “सलमान खान भिकारी बनून  भिकाऱ्यांना शोधायला जायचा. जेणेकरून तो योग्य लोकांपर्यंत अन्न पोहोचवू शकेल.” आयशा जुल्का म्हणाली, “सलामान खान अद्भुत आहे. मला सलमान खूप आवडतो कारण तो एक चांगला व्यक्ती आहे. मला आठवते की, जेव्हाही आम्ही शूट संपवून घरी परतायचो, तेव्हा मी त्यांना उरलेले अन्न पॅक करताना पाहायचे. रात्री उशिरा का होईना तो प्रत्येक भिकाऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करत असे. रस्त्यावर झोपलेल्या भिकाऱ्यांना उठवायचे किंवा कुणाला खरंच अन्नाची गरज भासली तर तो त्याला देत असे. गाडीतून उतरल्यावरही तो लोकांना जेवण देत असे. मला वाटते की, तो एक प्रेमळ व्यक्ती आहे. निःसंशयपणे एक उत्तम अभिनेता देखील. याशिवाय आयशा झुल्काने अनेक विषयावर संवाद साधला.”

सलमान खानच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर सध्या सलमान ‘बिग बाॅस 16’ शाेचे हाेस्ट करत आहे. याव्यतिरिक्त सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त पूजा हेगडे, राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम हे कलाकार या  दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद शामजी यांनी केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शिव ठाकरे निर्लज्ज’, म्हणत बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली ‘ही’ अभिनेत्री

‘हे टीझरच असा असेल तर मग चित्रपट तर विचारायलाच नको,’ आदिपुरुषवर ‘शक्तीमानची प्रतिक्रिया

हे देखील वाचा