Saturday, June 29, 2024

‘या’ चित्रपटाद्वारे पुन्हा दिसणार आयुष्मान आणि अनुभव सिन्हा ही अभिनेता-दिग्दर्शक जोडगोळी

आर्टिकल १५ च्या भरगोस यशानंतर अनुभव सिन्हा आणि आयुष्मान खुराना ही दिग्दर्शक-अभिनेता जोडी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाविषयी जास्त माहीती जरी प्राप्त झाली नसली, तरी अनुभव आणि आयुष्मान या दोघांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर चित्रीकरण सुरू होत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह नक्कीच वाढला आहे. “अनुभव सिन्हा सरांसोबत पुन्हा एकदा काम करण्यास उत्सुक आहे. ‘अनेक’ या चित्रपटातील जॉशूआ या पात्राचा लूक खास तुमच्यासाठी,” असे लिहीत त्याने पोस्ट शेअर केली.

या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले असून निर्मात्यांनी देशाच्या ईशान्य भागात शूटिंग होणार असल्याचे सांगितले आहे. सूत्रांच्या मते ‘अनेक’ हा आतापर्यंतचा अनुभवचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. मुल्क, आर्टिकल १५, आणि थप्पड यासारख्या समीक्षकांद्वारे प्रशंसा मिळवलेल्या आणि हिट होण्याच्या ट्रॅक रेकॉर्डसाठी अनुभव प्रख्यात आहे.

हे देखील वाचा