Tuesday, July 9, 2024

अरे देवा! हॉटेलमध्ये मुलाला विसरून आली होती आयुष्मान खुरानाची पत्नी, मग पुढं जे झालं…

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप ही एक उत्कृष्ट लेखिका आहे. तिने आतापर्यंत अनेक पुस्तकं लिहिली आहेत. नुकतेच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक पुस्तक लिहिले आहे, ज्यात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, ती तिचा मुलगा विराजवीर याला एका हॉटेलमध्ये विसरून आली होती.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिने सांगितले की, तिचा मुलगा विराजवीर याच्या जन्मानंतर काही दिवसांनी ती तिच्या मित्रांसोबत जेवण करायला बाहेर गेली होती. तसेच तिने हे देखील सांगितले की, आई झाल्यानंतर काय काय गोष्टी झाल्या. यासोबत तिने सांगितले की, ती तिच्या मुलाला हॉटेलमध्ये विसरून आली होती. (ayushman khurrana’s wife tahira kashyap forgot son at a restaurant)

ताहिराने पुढे सांगितले की, “मी हॉटेलमधून बाहेत जाताना बॅग आणि बिल घेण्यास विसरले होते यासोबतच मी माझ्या मुलाला देखील विसरले होते. त्यावेळी वेटर धावत आला आणि म्हणाला की, “मॅडम तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात.” त्यावेळी मला खूपच वेगळे वाटत होते आणि सगळे लोक माझ्याकडे बघत होते.”

ताहिराने सांगितले की, “मी असे बरेच काही केले आहे. मी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील मुलांना शाळेत पाठवायची जेणेकरून मला त्यांचा तो लूक पाहता यावा. यांसारख्या गोष्टी आजही होतात परंतु मी स्वतःला माफ करते. जेव्हा मी आजारी होते, तेव्हा माज्या मुलांची काळजी माझी आई घेत होती. ती मुलांना त्यांचा डबा बनवून देत असायची आणि या गोष्टीने काळजी करायची की, त्यांना आठवड्यातून दोनवेळा चीज सॅन्डचीज दिले आहे. हे पौष्टिक नाहीये.”

ताहिराने सांगितले की, “जेव्हा मी विराजवीरला हॉटेलमध्ये विसरून आले होते, तेव्हा तो अगदी लहान काही महिन्यांचा होता.” तिने तिच्या पुस्तकात देखील या घटनेचा उल्लेख केला आहे. ताहिराला कँसर झाला आहे, त्यामुळे तिच्यावर सध्या उपचार चालू आहेत. तिचा पती आयुष्मान खुराना तिची खूप काळजी घेतो. तसेच नुकतेच झालेल्या करावाचौथला त्याने ताहिरासाठी व्रत केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेसचा तडका! ताहिरा कश्यपचे हॉट फोटो पाहून चाहते तर सोडाच, पती आयुष्मानही झाला घायाळ

-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’

-बॉलिवूड सुपरस्टार्सच्या बायका होतायत ट्रोल; स्वत: छत्री घेऊन सुझेन अन् ताहिराने ड्रायव्हरला सोडले भिजत

हे देखील वाचा