Tuesday, July 9, 2024

दिवंगत अभिनेता इरफान खानच्या मुलाची पहिल्यांदाच घेतली आयुष्मान खुरानाने भेट, भावुक कविता केली शेअर

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान सध्या खूपच चर्चेत आहे. त्याला फिल्म फेअरचा सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. तसेच इरफान खानला निर्माते गिल्ड ऑफ अमेरिकाद्वारे 2021 च्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. इरफान खानच्या चाहत्यांसाठी हा एक खूप भावनिक प्रसंग आहे. या प्रसंगावर अभिनेता आयुष्मान खुराना हा देखील खूप भावनिक होताना दिसला आहे. त्याने इरफान खानची आठवण काढत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. यात एका कविताचाही समावेश आहे.

आयुष्मान खुरानाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कोणीतरी पेंट केले आहे. हा फोटो शेअर करत आयुष्मानने लिहिले आहे की, “हे बांद्रामध्ये कुठेतरी आहे, परंतु ते शांतीने आहे. आपल्या विजयाचा आनंद घेत आहे. सर्वोत्तम अभिनेता आणि लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड. हा फिल्मफेअर पुरस्कार मला बाबिलला देण्याची संधी मिळाली. या सुंदर मुलाला मी पहिल्यांदा भेटलो. त्याच्याकडे बघून जाणवत आहे की, हा भविष्यात खूप चांगले काम करणार आहे.”

आयुष्मानने पुढे लिहिले की, “आम्ही कलाकार एका खास प्रजातीमध्ये येतो. आमच्या काही कमजोरी असतात, कल्पना आणि वास्तविकता देखील असते. आम्ही निरीक्षण आणि अनुभवावर निर्भर असतो. आम्ही पडद्यावर अनेक वेळा जगतो आणि मरतो देखील. परंतु आमच्या अभिनयाची ताकद आम्हाला अमर बनवते.”

इरफान खानसाठी आयुष्मान खुरानाने कविता लिहिली आहे. तो म्हणतो की, “कलाकारांचा काही भूतकाळ नसतो की वर्तमानकाळ नसतो. जेव्हा केव्हा एखादा कलाकार येतो, तेव्हा त्याचा सगळीकडून सन्मान होत असतो. कारण प्रत्येक फनकार इरफान नसतो.”

इरफान खानचा मागील वर्षी 29 एप्रिल, 2020 रोजी निधन झाले होते. त्याच्या जाण्याने अवघ्या चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. परंतु आज तो या जगात नसला, तरीही तो आपल्या अभिनयामुळे नेहमीच चाहत्यांच्या आठवणीत राहील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सावत्र मुलीसोबतही आहे दिया मिर्झाचे चांगले नाते! फोटो शेअर करत प्रेम केले व्यक्त

-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा