×

Anek Trailer Out | यावेळी आयुष्मान खुरानाने आणला ‘हा’ संवेदनशील मुद्दा, काय आहे हे ‘चिंकी’ कनेक्शन?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) त्याच्या चित्रपटांमधून प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येतो. आयुष्मान खुराना, जो इंडस्ट्रीतील वेगळ्या आणि चौकट बाहेरील चित्रपटांसाठी ओळखला जातो, तो आणखी एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता लवकरच त्याच्या आगामी ‘अनेक’ या चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत आता प्रेक्षकांसाठी, निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता आयुष्मान खुराना एका गुप्त पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्याचा नवा लूक पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधील त्याचा दमदार अभिनय आणि दमदार डायलॉग पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्याच्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटात पोलिस बनल्यानंतर, आता अभिनेता पुन्हा एकदा पोलिस बनून गंभीर समस्या सोडवताना दिसणार आहे. (ayushmann khurrana starrer film anek trailer is out)

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो प्रदेश आणि भाषेच्या आधारावर विभागलेल्या भारतावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. ट्रेलर पाहून असे म्हणता येईल की, या चित्रपटातून आयुष्यमान पुन्हा एकदा एक गंभीर विषय प्रेक्षकांसमोर आणणार आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता आयुष्मान खुराना, यावेळी आपल्या चित्रपटातून पडद्यावर एक गंभीर मुद्दा ठळकपणे मांडताना दिसणार आहे. चित्रपटातील अभिनेत्याची अ‍ॅक्शन स्टाईलही चाहत्यांना खूप आवडली.

काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर आयुष्मान व्यतिरिक्त दीपलिना डेका, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा आदी कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आयुष्मान ‘अनेक’ चित्रपटानंतर रकुल प्रीत सिंगसोबत ‘डॉक्टर जी’मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तो पुरुष पॅथॉलॉजिस्टची भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post