Saturday, June 29, 2024

‘माझ्या करिअरचा प्रवास नाव कमावण्यासाठी धडपडणाऱ्या भारतीयासारखा’, मुलाखतीत आयुष्मान खुरानाचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना हा आज पडद्यावर अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावून सगळ्यांचे मनोरंजन करत असतो. त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने चित्रपटसृष्टीत त्याचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. यासाठी त्याचे खूप कौतुक देखील होत असते. तो अशा चित्रपटात काम करतो जे काही ना काही संदेश देतात. नुकताच त्याने त्याच्या करिअरबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील आपल्या करिअरबद्दल बोलताना आयुष्मानने असे सांगितले की, त्याच्या करिअरचा प्रवास हा प्रत्येक भारतीय नागरिकासारखा आहे, जो नाव कमावण्यासाठी धडपड करत असतो. ‘अनेक’ या चित्रपटात त्याने सांगितले होते की, ही गोष्ट खूप चांगली आहे की, सगळे भारतीय मला त्यांच्याशी जोडून ठेवतात.

आयुष्मानला हे त्याचे सगळ्यात मोठे केलेले कौतुक वाटते. तो असं म्हणतो की, “मी स्वतःला सामान्य माणसाप्रमाणे समजतो. माझ्या करिअरचा प्रवास देखील सामान्य भारतीयाप्रमाणेच आहे. मी आज जे काही यश मिळवले आहे ते मेहनतीच्या जोरावर कमवले आहे.” यानंतर त्याने असे म्हंटले की, “मी त्यांच्या जीवनाला आहे तसं पडद्यावर मांडण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक प्रेरणादायी कहाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यातच लोकांना समाधान मिळते. कदाचित याच गोष्टीमुळे सगळे जोडून राहतात.”

आयुष्मान खुरानाने 2012 मध्ये आलेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आता त्याच्याकडे अनेक नवीन चित्रपट आहेत. ज्यामध्ये ‘अनेक’, ‘चंदिगढ के आशिकी’, ‘डॉक्टर’ या चित्रपटाचा समावेश आहे. त्याने शेवटचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपट काम केले होते.

नुकतेच आयुष्मान आणि ताहिरा कश्यप यांनी त्यांच्या लग्नाचा 20 वा वाढदिवस साजरा केला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ताहिराने थ्रोबॅक फोटो शेअर करत आयुष्मानबद्दल भावना शेअर केल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

-‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पडली होती टीव्हीवर भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात, १६ व्या वर्षी निभावले होते सूनेचे पात्र

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा