Saturday, June 29, 2024

भावंडांच्या ‘बारिश की जाए’ गाण्यावरील डान्सने जिंकले सर्वांचे मन, गायक बी प्राकने शेअर केला जबराट व्हिडिओ

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सुनंदा शर्मा अभिनित ‘बारिश की जाए’ गाणे आजकाल खूप धमाल करत आहे. खास गोष्ट म्हणजे या गाण्याला आतापर्यंत 50 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहतेही या गाण्यावर वेगवेगळे व्हिडिओ बनवताना दिसत आहेत.

त्याचवेळी नुकताच समोर आलेला, ‘बारिश की जाए’ गाण्यावरील एका भावंडांचा डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात दोघेही जबरदस्त स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ गायक बी प्राकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या भावंडांच्या डान्सने सर्वांची मने जिंकली आहेत. व्हिडिओ पाहून युजर्सही भावंडांचे खूप कौतुक करताना दिसले.

‘बारिश की जाए’ वरील या भावंडांचा व्हिडिओ शेअर करत बी प्राकने लिहिले, “50 दशलक्ष, #बारिशकीजाए, मित्रांनो, आपणा सर्वांवर माझे प्रेम आहे. याला प्रसिद्ध करण्यासाठी, आपणा सर्वांचे आभार. हे रील्सवर बरेच ट्रेंड होत आहे.”

बी प्राकने शेअर केलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी, युजर्सही व्हिडिओवर ‘क्या बात है’ आणि ‘ब्रिलियंट’ अशा कमेंट्स देऊन प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सुनंदा शर्माची जोडी पाहायला मिळाली, ज्याने यूट्यूबवर जबरदस्त धमाल केली.

‘बारिश की जाए’ गाण्यात नवाजुद्दीन सिद्दीकी गायिका सुनंदा शर्माच्या निरागसपणाच्या प्रेमात पडतो. शेवटी दोघांचेही लग्न होते. हे गाणे आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट असणारे गाणे असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, जिथे इतर संगीत व्हिडिओ तयार करण्यासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च केले जातात, तिथे हे गाणे तयार करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.

बी प्राकबद्दल बोलायचे झाले, तर त्याने हे गाणे अतिशय सुंदर स्टाईलमध्ये गायले आहे. अलीकडेच त्याच्या ‘तेरी मिट्टी’ या गाण्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

-प्राणघातक अपघाताची आठवण काढत अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली ‘अजय- काजोल यांनी संपूर्ण इंडस्ट्रीपासून लपवली ही गोष्ट’

-कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

हे देखील वाचा