Thursday, July 18, 2024

‘बाहुबली प्रभासच्या शिरपेचात मानाचा तुरा! ठरला 2021 वर्षातील ‘टॉप आशियायी सेलिब्रिटी’

फक्त दाक्षिणात्य सुपरस्टार नाही तर बॉलिवूड सुपरस्टार असणाऱ्या प्रभासने त्याच्या बाहुबली सिनेमातून जागतिक ओळख निर्माण केली. प्रभासला या सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. आजपर्यंत प्रभासने अनेक दाक्षिणात्य आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्याला त्याच्या करिअरमध्ये अनेक लहानमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. आता त्याच्या या सन्मानांमध्ये अजून एका मोठ्या सन्मानाची भर पडली आहे.

प्रभासला 2021वर्षांमधील सर्वात मोठा साऊथ आशियायी सेलिब्रिटी म्हणून स्थान देण्यात आले आहे. ब्रिटनच्या ‘ईस्टर्न आय’ या वृत्तपत्रात एक लिस्ट प्रकाशित करण्यात आली आहे. यात जगातील 50आशियायी सेलिब्रिटी सामील असून, यात पहिल्या क्रमांकावर प्रभासचे नाव आहे. प्रभासने अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी, संगीत क्षेत्र, टेलिव्हिजन, सोशल मीडिया, साहित्य आदी अनेक क्षेत्रातील दिग्गजांना मात देत हे स्थान काबीज केले आहे. तर याच यादीत प्रियांका चोप्राला तिसरे स्थान देण्यात आले आहे.

ईस्टर्न आय एंटरटेनमेंट एडिटर असजद नजीर यांनी ही यादी तयार केली असून, त्यांनी भारतीय चित्रपटांवर प्रभासची असलेली छाप आणि त्याच्याबद्दल सांगताना म्हटले, “प्रभासने भारतातील प्रादेशिक भाषांकडे अशा प्रकारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, जसे आधी कोणीच घेतले नव्हते. त्याने हे दाखवले की, बॉलिवूड बॉस नाहीये. सबतच सर्वांना एकत्र अनेक भाषांमध्ये भारतीय चित्रपटांना प्रदर्शित करण्यासाठी प्रेरित केले. प्रभासने संपूर्ण जगात कोणत्याही आशियायी सेलिब्रिटींसाठी सर्वात जास्त वाढणाऱ्या फॅन्ससोबतच अगदी सहजतेने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले. त्याने कोणताही गाजावाजा न करत अनेक चांगले कामं देखील केले. जगात सर्वात जास्त रिलेटेबल स्टार म्हणून त्याने स्वतः सिद्ध केले आहे.

यावर अजून प्रभासकडून कोणतेही उत्तर आले नाहीये. सध्या प्रभास त्याच्या आगामी राधे श्याम, आदिपुरुष, सालार, स्पिरिट आदी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. प्रभासच्या या उपलब्धीवर त्याच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचे दिग्दर्शक असणाऱ्या राधा कृष्ण कुमार यांनी सांगितले की, “प्रभास खरंच कौतुकास पात्र आहे. तो सेटवर ज्या ऊर्जेने येतो आणि कामं करतो ते खरंच बघण्यासारखे आणि आचरणात आणण्यासारखे आहे. मी आता ‘राधे श्याम’ पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादासाठी खूपच उत्सुक आहे.” राधे श्याम हा सिनेमा येत्या १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अधिक वाचा –
‘के प्रोजेक्ट’च्या सेटवर दीपिका करतेय नखरे,अडचणीत आला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास
फ्लॉप चित्रपट देऊनही अभिनेता प्रभासने वाढवले मानधन, आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

हे देखील वाचा