Wednesday, June 26, 2024

‘बारिश की जाए’ गाण्यासह नवाजुद्दीन सिद्दीकीची संगीत उद्योगात धमाकेदार एंट्री! एकाच दिवसात मिळाले ४९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या कामात पूर्णपणे उत्साही असतो आणि आपल्या प्रत्येक कामगिरीने चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करत असतो. आपण त्याची अष्टपैलू कामगिरी तर पाहिलीच आहे आणि आता तो बी प्राकने गायलेल्या ‘बारिश की जाए’ या गाण्याने संगीत क्षेत्रातही आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी रिलीझ झालेल्या या टिझरने मनोरंजन उद्योगातही धुमाकूळ घातला होता आणि सर्वत्र चर्चा रंगवल्या होत्या.

या गाण्यातील अनुभवाविषयी बोलताना, नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, “एखाद्या संगीत अल्बममध्ये काम करणे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते. पण मी त्यातल्या प्रत्येक भागाचा चांगलाच आनंद घेतला. गाण्याचे शूटिंग करण्याचा माझा अनुभव खूपच मजेदार होता आणि हे गाणे नेहमीच माझ्या हृदयात एक विशेष स्थानी राहील.”

प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन प्रेक्षकांना आनंदित करण्याचा त्याचा मोह त्याच्या सर्व चाहत्यांद्वारे पसंत केला जातो. त्याचप्रमाणे या गाण्यालाही चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘बारिश की जाए’ मधील अभिनेत्री व गायिका सुनंदा शर्मासुद्धा या व्हिडिओत दिसली आहे. या गाण्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत. हे गाणे देसी मेलोडीजच्या बॅनरखाली तयार केले गेले आहे. या गाण्याला एकाच दिवसात ४९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले, तर नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या लखनऊमध्ये ‘जोगिरा सारा रा रा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री नेहा शर्मा स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच समोर आलेला शूटिंगच्या सेटवरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नवाज नेहाला लायकीत राहण्यासाठी सांगताना दिसतो. वास्तविक हा एक मजेदार व्हिडिओ आहे, ज्याला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

हे देखील वाचा