Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड आर्यन खान प्रकरणावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘संपूर्ण इंडस्ट्रीने मिळून कचरा…’

आर्यन खान प्रकरणावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘संपूर्ण इंडस्ट्रीने मिळून कचरा…’

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मुंबई क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता या अं’मली पदार्थ प्रकरणाशी अभिनेत्री अनन्या पांडेचे नावही जोडले गेले आहे. या संपूर्ण प्रकरणावर योगगुरू बाबा रामदेव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बाबा रामदेव यांनी नशेच्या विनाशकारी तंत्राला भारताच्या तरुण पिढीसाठी घातक म्हटले आहे. ते म्हणाले की, जे लोक त्यांना आदर्श मानतात, तेच अं’मली पदार्थांच्या प्रकरणात अडकत आहेत. यामुळे लोकांना चुकीची प्रेरणा मिळते. बाबा रामदेव म्हणाले की, “संपूर्ण इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ केला पाहिजे, अन्यथा तो (बॉलिवूड उद्योग) त्यांच्यासाठीही धोकादायक आणि आत्मघातकी ठरेल.”

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना राष्ट्रीय हिताविरुद्ध
बाबा रामदेव यांनी रविवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामनाही राष्ट्रहिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. बाबा रामदेव म्हणाले की, “या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आमच्या राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय धर्माच्या विरुद्ध आहे. एका बाजूला क्रिकेट आणि दुसरीकडे दहशतवादाचा खेळ असू शकत नाही.” बाबा रामदेव नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

पेट्रोल आणि डिझेल का महाग होत आहे?
जेव्हा बाबा रामदेव यांना पत्रकारांनी त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी म्हटले होते की, काळा पैसा परत आल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील. पण असे काहीही का झाले नाही? तर बाबा रामदेव म्हणाले की, “मी पेट्रोलची किंमत क्रूडनुसार असावी, असा सल्ला दिला होता आणि कमी करही सुचवला होता. पण सरकारला अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबवायचे आहेत आणि आर्थिक आव्हानांनाही तोंड द्यावे लागत आहे. या कारणांमुळे सरकार कर कमी करण्यास सक्षम नाही. पण एक दिवस हे नक्की होईल.”

बाबा रामदेव यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडले. नागपुरात एका कार्यक्रमाअंतर्गत ते आले होते. या दरम्यान, पत्रकारांनी त्यांना नागपूर विमानतळावर नेले आणि अनेक ज्वलंत प्रश्नांवर त्यांचे मत विचारले. बाबा रामदेव यांनीही सर्व प्रकारच्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ‘आम्ही योगा करत आहोत आणि बाबा काम- धंदा’, रामदेव बाबांवर बरसताना दिसले कवी कुमार विश्वास

-‘हिंमत असेल, तर आमिर खानविरुद्ध मोर्चा काढा’, म्हणत ऍलोपॅथीमुळे चर्चेत असलेल्या रामदेव बाबांनी केला व्हिडिओ शेअर

-‘एवढी हिम्मत झालीच कशी?’ तापसी पन्नूनंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची रामदेव बाबांवर आगपाखड

हे देखील वाचा