Sunday, June 8, 2025
Home मराठी ‘बबन’, ‘ख्वाडा’ च्या दमदार यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘टीडीएम’ चित्रपट, दिग्दर्शकांची पोस्ट चर्चेत

‘बबन’, ‘ख्वाडा’ च्या दमदार यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘टीडीएम’ चित्रपट, दिग्दर्शकांची पोस्ट चर्चेत

मराठी सिने जगतात सध्या अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. चित्रपटांच्या नाविण्यपूर्ण कथा मांडणी आणि प्रेक्षकांच्या भेटीला येणारे नवनवे कलाकार यांमुळे मराठी सिने जगताचे रुपडे बदलताना दिसत आहे. असाच आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट निर्माते भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी यंदाच्या ‘हिवाळ्यात टिडीएम पार्टी’ असे म्हणत आपल्या फेसबूक अकाउंटवरुन टीडीएम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली आहे. काय आहे त्यांची ही फेसबूक पोस्ट चला जाणून घेऊ. 

मराठी सिनेसृष्टीतील नवोदित दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी ‘ख्वाडा’, ‘बबन’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील भावनिक विषयांवरील त्यांचे हे चित्रपट प्रचंड गाजले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर बबन आणि ख्वाडा चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता भाऊराव कऱ्हाडे यांचा या हिवाळ्यात ‘टी.डी.एम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याबद्दलची त्यांची फेसबूक पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

https://www.facebook.com/bhaurao.karhade

भाऊराव कऱ्हाडे यांनी आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी यंदाच्या हिवळ्यात ‘टीडीएम’ पार्टी असा कॅप्शन देत आपल्या या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये खांद्यावर काठी टाकून उभा असलेला एक तरुण दिसत आहे. तसेच त्याच्या समोर ट्रॅक्टरही उभा असलेला दिसत आहे. या चित्रपटाच्या एकून पोस्टर आणि मांडणी वरुन भाऊराव कऱ्हाडे यांचा हा चित्रपटही ग्रामीण भागातील एका नाविण्यपूर्ण विषयांवर असणार असा अंदाज लावला जात आहे. काय असेल या चित्रपटाची कथा आणि तो कधी प्रेक्षकांंच्या भेटीला येईल हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान भाऊराव कऱ्हाडे यांच्या या आगामी चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लेखन स्वतः त्यांनीच केले आहे. आता प्रेक्षकांनाही त्यांच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

हे देखील वाचा