Saturday, July 6, 2024

इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

शनिवारी (27 मार्च) मुंबईत झालेल्या 66 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात, इरफान खानचा मुलगा बाबिल उपस्थित होता. दोन पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो वडील इरफान खानच्या वतीने आला होता. इरफानला त्याच्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त, त्याला मरणोत्तर 2021 जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

बाबिलने रविवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याने आपल्या वडिलांचे कपडे परिधान केले आहेत. या माध्यमातून त्याने त्याचे बाबा म्हणजेच इरफान खानची आठवण काढली आणि तो खूप भावुक झाला. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याची आई सुतापा देखील दिसली आहे.

व्हिडिओमध्ये आई सुतापा सिकंदर मुलगा बाबिलला तयार होण्यास मदत करताना दिसत आहे. यावेळी, वडिलांचे स्मरण करून तो इतका भावुक झाला की, त्याने आईला मिठी मारली. त्याशिवाय त्याने आपल्या भाषणातील एक भागही शेअर केला, जो त्याने जयदीप अहलावत, राजकुमार राव आणि आयुष्मान खुराणा यांच्याद्वारे इरफान खानचा पुरस्कार स्वीकारताना म्हटला होता.

बाबिलने लिहिले, “खरं तर मी म्हणालो होतो, हे स्थान माझ्या काही म्हणण्यासाठी नाही. लोक नेहमीच म्हणतात की, आपण आपल्या वडिलांच्या बुटांमध्ये फिट नाही होऊ शकत, परंतु कमीतकमी मी त्यांच्या कपड्यांमध्ये फिट होऊ शकतो. मी प्रेक्षक आणि या इंडस्ट्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. कारण तुम्ही आमच्या कुटुंबाला ज्याप्रकारे आपलंसं केलं आणि मी खरोखर असे म्हणू शकतो की, आपण आणि मी मिळून हा प्रवास पूर्ण करू आणि भारतीय सिनेमाला नव्या उंचीवर नेऊ, मी वचन देतो.” याव्यतिरिक्त त्याने दुसर्‍या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ते गेल्यानंतरही तुम्ही कलेबद्दलची त्यांची बांधिलकी ओळखली आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही खूप आभारी आहोत.”

बाबिलने पुढे लिहिले की, “कपड्यांमागची गोष्ट अशी होती की, माझ्या वडिलांना फॅशन शो आणि रॅम्प वॉकमध्ये भाग घेणं आवडत नव्हतं, परंतु आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला त्यांनी या कपड्यांमध्ये हे केले. काल रात्री मी नेमके हेच करत होतो आणि नवीन ठिकाणी जात होतो, ज्याने मला अस्वस्थ केले.”

यापूर्वीही इरफान खानच्या मुलाने दोन वेगवेगळे इंस्टाग्राम पोस्ट शेअर केले होते. इरफान खानचे कार्य ओळखण्यासाठी बाबिल आणि सुतापा सिकंदर यांनी फिल्मफेअरचे आभार मानले.

सुतापाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “एक सुंदर रात्र! तुम्ही हे सिद्ध केले की, तुम्हाला तुमच्या कामाबद्दल बोलण्याची गरज नाही.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवंगत अभिनेता इरफान खानच्या मुलाची पहिल्यांदाच घेतली आयुष्मान खुरानाने भेट, भावुक कविता केली शेअर

-फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२१: इरफान खानला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार, तर तापसी पन्नू ठरली सर्वोत्तम अभेनेत्री; पाहा संपूर्ण यादी

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा