Saturday, July 6, 2024

शाहरुख खानसोबत रुग्णालयात दिसली मुनमुन दत्ता, नेमकं काय आहे प्रकरण?

टेलिव्हिजनवरील बहुचर्चित आणि लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. प्रत्येक पात्राचा एक वेगळा अंदाज आहे, जो चाहत्यांना चांगलाच भावतो. यातील कथांचा विचार केला, तर बबिता जी आणि जेठालालची अधुरी प्रेमकहाणी आपण कशी विसरू शकतो. पण आजकाल बबिता जीचा एका इतर व्यक्तीसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर बॉलिवूडचा किंग खान आहे.

व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला आहे आणि मुनमुन दत्ता त्याच्या शेजारी नर्सच्या लूकमध्ये दिसत आहे. शाहरुख खानला पेशंटच्या भूमिकेत पाहून मुनमुन खूप खूश दिसत आहे. मुनमुनच्या चेहऱ्यावरचे हास्य स्पष्टपणे सांगत आहे की, ती शाहरुखसोबत काम करताना किती आनंदी आहे. (babita ji spotted with shah rukh khan in hospital video gone viral)

जाहिरातीत केलं होतं एकत्र काम
खरंतर ही पेनची जुनी जाहिरात आहे आणि यात दोघांनी एकत्र काम केलं आहे. या जाहिरातीत शाहरुख खानने पेशंटची भूमिका साकारली होती आणि मुनमुन दत्ता नर्स बनली होती. यात पायाचे हाड तुटल्यामुळे शाहरुख बेडवर पडून असतो. तर मुनमुन किंग खानच्या पायावर लावलेल्या प्लास्टरवर पेन घेऊन सही करताना दिसत आहे.

तुरुंगात आहे किंग खानचा मुलगा
सध्या शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानच्या अं’मली पदार्थ प्रकरणामुळे अडचणीत आहे. आर्यन ३ ऑक्टोबरपासून कोठडीत आहे. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने दोनदा फेटाळला आहे. आता आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याचवेळी मुनमुन दत्ता तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. मात्र तिने नेहमी अशा बातम्यांना खोटे म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख खानची नवी दिवाळी जाहिरात इंटरनेटवर घालतेय धुमाकूळ, नेटकऱ्यांची ‘अशी’ होती रिऍक्शन

-राज अनादकटच्या अगोदर ‘या’ अभिनेत्याशी जोडलं जायचं मुनमुन दत्ताचं नाव, पण नंतर तिने…

-लग्नाला ३० वर्षे पूर्ण; ‘माझ्याशी लग्न करशील का’, म्हणून शाहरुखने ठोकली होती धूम; वाचा तो किस्सा

हे देखील वाचा