Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड मुलाच्या आठवणीत भावुक होऊन रडायला लागली रेसलर बबीता फोगाट, कंगना रणौतने दिला आधार

मुलाच्या आठवणीत भावुक होऊन रडायला लागली रेसलर बबीता फोगाट, कंगना रणौतने दिला आधार

सध्या मनोरंजन क्षेत्रात सर्वत्र कंगणा रणौतच्या ‘लॉकअप’ या रियॅलिटी शोची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे.एकता कपूरच्या अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेवर प्रसारित होणारा हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. कार्यक्रमाच्या सहभागी अभिनेत्रींपासून अनेक कारणामुळे हा कार्यक्रम पहिल्यापासूनच चर्चेत राहिला होता. कार्यक्रम चालू होवून आठवडा उलटल्याने कंगणा रणौत कार्यक्रमातील सहभागी कलाकारांशी चर्चा करताना दिसून आली. यावेळी सहभागी स्पर्धक आणि कुस्तीपटू बबिता फोगट कंगणाच्या प्रश्नाचे उत्तर देताना रडताना दिसून आली. नेमके काय होते यामागचे कारण चला जाणून घेऊ.

कंगणा रणौतच्या  (kangana ranaut) ‘लॉकअप’मध्ये अडकलेल्या अभिनेत्री आणि या कार्यक्रमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कार्यक्रमात श्वेता तिवारी, उर्फी जावेद, पायल रोहतगी अशा एकापेक्षा एका दमदार अभिनेत्रींचा भरणा असल्याने हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजत आहे. कार्यक्रम चालू होवून आठवडा झाल्याने कार्यक्रमाची होस्ट कंगणा स्पर्धकांशी चर्चा आणि त्यांचे अनुभव विचारताना दिसून आली. यावेळी तिने सहभागी स्पर्धकांना या पहिल्या आठवड्यात आलेले अनुभव जाणून घेत होती. ज्यावेळी ती बबिता फोगटपाशी जाऊन उभी राहिली तेव्हा ती खूपच भावूक झाल्याचे दिसून आली ज्यावेळी कंगणाने तिला आपल्या या पहिल्या आठवड्यात आलेले अनुभव विचारले आणि तुझ्या लहान मुलाची आठवण येत आहे का असे विचारले तेव्हा बबिताला रडू कोसळले.

आपल्या मुलाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या बबिताला रडू कोसळलेले पाहून कंगणाने तिची समजूत काढत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.यावेळी “मी समजु शकते की तुमचे बाळ लहान आहे, त्याची आठवण येणे साहजिक आहे मात्र आत्ता भावनिक होऊन चालणार नाही,” असे म्हणत कंगणाने तिला समजावून सांगितले. शेजारी उभ्या असलेल्या पायलनेही बबिताला धीर देण्याचा प्रयत्न केला. “आपल्या देशात अनेक महिला आपल्या मुलांना घरी ठेवून कामावर जातात, त्यांच्याकडून संपुर्ण देशाला आशा असतात” असे म्हणत कंगणाने बबिताची समजूत काढली. तेव्हा ती शांत झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यक्रमातील इतर स्पर्धकांनाही कंगणा खडेबोल सुनावताना दिसून आली.

हे देखील वाचा