बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सेनन अभिनित ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. होळीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार, क्रिती सेननसह संपूर्ण स्टारकास्टने मुंबई ते दिल्लीपर्यंत त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन केले. मात्र, चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.पण आता अलीकडेच क्रिती सेननने ‘बच्चन पांडे’च्या दरम्यानचा ‘बिहाइंड द सीन’ (BTS) व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने तिच्या चाहत्यांना प्रमोशनदरम्यान कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले हे सांगितले.
प्रमोशनदरम्यान क्रिती सेननला झाली दुखापत
क्रिती सेननने (Kriti Sanon) नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘द कपिल शर्मा शो’च्या प्रमोशनदरम्यानचा पडद्यामागचा आहे. ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनदरम्यान क्रिती सेनन खूप चर्चेत होती. क्रितीच्या या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चाहत्यांना भारतीय लूकपासून ते वेस्टर्न लूक पाहायला मिळाला. खर तर, क्रिती सेननला फॅशन गोल आणि सुंदर दिसण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. क्रितीने पडद्यामागील पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या क्लिपमध्ये ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनजवळ उभी असताना बोलताना दिसत आहे. पण त्यानंतर क्रिती पडली आणि तिच्या अंगठ्याला दुखापत झाली.
क्रिती सेननने अंगठ्याला जखम होऊनही हाय हिल्स घालून कोणत्याही विश्रांतीशिवाय तिच्या चित्रपटाचे प्रमोशन केले. या व्हिडिओमध्ये क्रिती सेनन वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसत आहे. क्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) कमेंट करत लिहिले, “आशा आहे की आता तुझा अंगठा पूर्वीपेक्षा चांगला होईल.” जॅकलिनच्या या कमेंटला चाहतेही प्रतिसाद देत आहेत आणि तिच्या सहकलाकारांबद्दलच्या काळजी वाटणाऱ्या वागणुकीचे कौतुक करत आहेत. जॅकलिनच्या या कमेंटला क्रितीनेही उत्तर दिले आणि लिहिले की, “पूर्वीपेक्षा खूप चांगले.”
क्रिती सेनन आणि वरुण धवन त्यांच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा