Wednesday, July 2, 2025
Home अन्य लूक बॅकलस पण टेन्शन फ्री ! हे हॅक्स बघितल्याशिवाय ड्रेस घालू नका!

लूक बॅकलस पण टेन्शन फ्री ! हे हॅक्स बघितल्याशिवाय ड्रेस घालू नका!

मुलींना बॅकलस ड्रेस घालताना एकच टेंशन असतं, ब्राचं पट्टं कुठे दिसायला नकाे ! पण काळजी करु नका,आम्ही तुम्हाला काही साेपे आणि कामाचे ट्रिक्य सांगणार आहाेत जे तुमचं हे टेन्शन एकदम दूर करतील.

मुलींसाठी स्टायलिश कपडे घालणं म्हणजे थाेडं कठीणच असतं. वेगवेगळ्या ड्रेससाठी याेग्य इनरवेअर निवडणंही एक गाेष्ट असते. आणि जर ड्रेस ब्रॅकलस असेल, तर ब्राचं पट्टं दिसू नये याची खास काळजी घ्यावी लागते. मग अशा वेळी प्रश्न पडताे, बॅकलस ड्रेसखाली असं काय घालावं की ताे नीट आणि काॅन्फिडंटली कॅरी करता येईल ?

फॅशन इन्फ्लुएंसर कुशा कपिला नेहमी अशा युजफुल टिप्स शेअर करत असते. तिने इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ सिरीज टाकली आहे, ज्यात तिने काही साेप्पे आणि काामाचे ब्रा हॅक्स सांगितले आहेत, जे तुम्ही बॅकलस ड्रेससाेबत नक्की ट्राय करु शकता !

बॅकलस ड्रेस घालायचाय? मग हे साेप्पे हॅक्स नक्की वापरुन बघा :
• बॅकलस ड्रेस मध्ये ब्रेस्टला लिफ्ट द्यायचं असेल, तर निप्पल पेस्टी वापरु शकता. ज्यांचं ब्रेस्ट साइज मीडियम आहे, त्यांच्यासाठी हा ऑप्शन एकदम परफेक्ट आहे.
• तुम्ही बनी अप्स (Bunny Ups) वापरुनही बॅकलस ड्रेस छान कॅरी करु शकता. हे वेगवेळ्या साइजमध्ये मिळतात, तुमच्या साइजप्रमाणे निवड करा.
• बूब टेप्स हाही एक मस्त पर्याय आहे. हे निप्पल्य कवर करतात आणि ब्रेस्टला नीट सपाेर्ट देतात, त्यामुळे तुम्ही ड्रेस छान काॅन्फिडन्सने घालू शकता !

कुशा कपिला ही एक फॅशन साेशल मीडिया इन्फ्लुएंसर असून त्याचबराेबर अभिनेत्री आहे. यूट्यूब तिचे 1.49 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर तब्बल 4.2 मिलियन फाॅलाेअर्स आहेत. ती ‘मसाबा मसाबा’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘प्लान ए प्लान बी’ आणि ‘थैंक यू फॉर कमिंग’ या सारख्या वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे. शिवाय तिने ‘कॉमिकस्तान सीजन 3’ हा शाे अमेझाॅन प्राॅइमवर हाेस्टसुद्धा केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

प्रसिद्ध टेलीव्हिजन अभिनेत्रीने केला अलैंगिक असल्याचा खुलासा; सुंदर कवितेतून सांगितली बात…

हे देखील वाचा