प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘बडे अच्छे लगते हैं’च्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या मालिकेतील मुख्य अभिनेता नकुल मेहताची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र नकुलला कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल आहे, याचा खुलासा करण्यात आला नाही. पण आता अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यासोबतच नकुल मेहताने त्याच्या पोस्टमध्ये आपल्या आजाराबाबतही खुलासा केला आहे. काय आहे ती व्हायरल पोस्ट चला जाणून घेऊ.
छोट्या पडद्यावरील ‘बडे अच्छे लगते है’ मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या नकुल मेहताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु याबद्दलचा खुलासा मात्र करण्यात आला नव्हता. आता नकुल मेहताने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नकुलने केवळ त्याच्या ऑपरेशनबद्दलच सांगितले नाही तर या पोस्टद्वारे त्याच्या आजाराचा खुलासाही केला आहे. नकुलने त्यांचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले आहे आणि काही दिवसांत तो बरा होईल. अशी माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.
नकुल मेहताने या व्हायरल पोस्टमध्ये नकुलने “माझे मामा नेहमी म्हणायचे की आयुष्य हे नेहमीच चॉकलेटच्या बॉक्ससारखे असते. तुम्हाला काय मिळणार आहे हे माहीत नव्हते. मी २४ तास रुग्णालयात आहे. हे घडताच माझ्या मनात पहिली गोष्ट आली की, यामुळे शूटिंग थांबेल पण सत्य हे आहे की तुम्ही सर्व काही प्लॅन करू शकत नाही. लोकांनी मला अनेक मेसेज, कॉल आणि ट्विट केले. त्यांना पाहून मी थक्क झालो. माझी ताकद परत येण्यासाठी आणि पुन्हा कॉफी पिण्यास सुरुवात करण्यासाठी मला काही दिवस लागतील. पण या सगळ्यात, आनंदाची बातमी अशी आहे की, माझ्या विनोदबुद्धीवर नव्हे तर अपेंडिक्सवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे,”असे सांगत तो लवकच ठिक होणार असल्याचे म्हणले आहे.
- हेही वाचा-
- ‘अनुपमा’ पासून ‘बडे अच्छे लगते है २ पर्यंत, यामुळे प्रेक्षकांनी फिरवलीय लोकप्रिय मालिकांकडे पाठ
- Ashram 3 | बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने मागितली वडिलांची परवानगी, ‘असे’ मिळाले उत्तर
- अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमा ‘या’ दोन राज्यामध्ये झाला टॅक्स फ्री, जाणून घ्या टॅक्स फ्री झाल्यानंतर काय फरक पडतो