Tuesday, July 9, 2024

‘या’ पुरस्काराच्या सादरकर्त्यांमध्ये प्रियांका चोप्राची निवड; तिच्या ‘द व्हाइट टायगर’ला मिळाले दोन श्रेणीमध्ये नामांकन

चित्रपट अभिनेत्री आणि निर्माता प्रियांका चोप्रा जोनासची 74व्या ‘ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स'(बाफ्टा) पुरस्कारांसाठी सादरकर्ता म्हणून निवड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना विषाणू या जागतिक साथीच्या रोगामुळे, फेब्रुवारी महिन्यात स्थगित केलेला वार्षिक पुरस्कार समारंभ 10 आणि 11 एप्रिल रोजी रॉबर्ट अल्बर्ट हॉलमध्ये होणार आहे.

बाफ्टाने जाहीर केले की, प्रियांका चोप्रा जोनास व्यतिरिक्त, सादरकर्त्यांमध्ये फोएब डिनेवॉर, चिवेटल इजिओफोर, सिन्थिया एरिव्हो, ह्यूग ग्रँट, रिचर्ड ई. ग्रँट, टॉम हिडलस्टन, फेलिसिटी जॉन्स, गुगु एम्बाथा रॉ, जेम्स मॅकाव्हॉय, डेव्हिड ओयलॉव्हो आणि पेड्रो पास्कल यांचाही समावेश आहे.

‘क्वांटिको’ चित्रपटाच्या अभिनेत्रीने अलीकडेच तिचा पती आणि पॉप स्टार निक जोनाससमवेत, ऑस्कर नामांकनाची घोषणा केली. प्रियांका चोप्रा जोनास आणि लंडनमधील अन्य कलाकार व्यतिरिक्त, सादरीकरणाच्या रूपात लॉस एंजेलिसमधील रोझ बायर्न, आंद्रा डे, अण्णा केंड्रिक आणि रेनी झेलवेगरही सामील होतील.

प्रियांकाचा अखेरचा चित्रपट ‘द व्हाइट टायगर’ याला बाफ्टामध्ये, एक नव्हे तर दोन कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीत आदर्श गौरव यांचे नाव आणि दिग्दर्शक कॅटेगरीत रुपांतरित पटकथासाठी रमीन बहरानी यांचे नाव आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘द बिग बुल’ पाहून युजरने अभिषेक बच्चनच्या अभिनयाला म्हटले ‘थर्ड क्लास’, त्यानेही दिले गांधीगिरी स्टाईलमध्ये प्रत्युत्तर

-खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन

-धक्कादायक! बिग बॉस कन्नडच्या माजी कंटेस्टेंटचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सासरच्यांवर केले गंभीर आरोप

हे देखील वाचा