Saturday, June 29, 2024

‘बाहुबली’ फेम अभिनेत्री राम्या कृष्णनने घेतली कोरोनाची लस; फोटो शेअर करत चाहत्यांनाही केले लस घेण्याचे आवाहन

कोरोना विषाणूची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. अलीकडेच बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. हा साथीचा रोग टाळण्यासाठी लसीकरण सुरू केले असून कोविड-19 द्वारे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना ही लसी दिली गेली आहे. नुकतीच ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री राम्या कृष्णनलाही या लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

अभिनेत्री राम्या कृष्णनने कोरोना लस टोचतानाचा तिचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ”वॅक्सिनेटेड.” कोविड-19 हॅशटॅगद्वारे तिने चाहत्यांनाही ही लस घेण्याचा सल्ला दिला. फोटोत राम्या कृष्णन मास्क घालून कॅमेर्‍याकडे पोज करताना दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर राम्या कृष्णन सध्या ‘लायगर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात टॉलिवूड सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. तसेच हा चित्रपट तमिळ, तेलुगु, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

राम्यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी कोविड-19 ची लस घेतली आहे. काही दिवसांपूर्वी टॉलिवूड सुपरस्टार अभिनेता नागार्जुन अक्किनेनी याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. सुपरस्टार मोहनलाल आणि कमल हासन यांनीही कोरोनाची लसी घेतली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड जगातील अनेक सुपरस्टार्सनाही कोरोना लस मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी आशा पारेख आणि अनूप जलोटा यांना कोरोनाची लस टोचवल्याचे फोटो समोर आले होते. यांच्यापूर्वी सैफ अली खान, सतीश शाह, जॉनी लिव्हर, जितेंद्र, परेश रावल, अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनी कोरोनाची लस घेतली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

हे देखील वाचा