Friday, July 5, 2024

‘बजरंगी भाईजान’ फेम ‘मुन्नी’ने केला गरबा डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी!’

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘बजरंगी भाईजान’मध्ये मुन्नीची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा ​​सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हर्षालीचे इंस्टाग्रामवर १.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ती नवीन व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अशातच नवरात्रीच्या निमित्ताने हर्षालीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ती गरबा डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनीही प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

हर्षालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून डान्स व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, “दांडिया/गरबा नृत्याबद्दल जास्त माहिती नाही, पण नवरात्री त्याशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच मी हे नृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे.” हर्षालीच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, ती ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ५८ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हर्षाली मल्होत्राने ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीच्या व्यक्तिरेखेने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटानंतर चाहते तिला ‘मुन्नी’ नावाने ओळखू लागले आहेत.

हर्षालीबद्दल बोलायचं झालं, तर तिचा जन्म ३ जून, २००८ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला आहे. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटानंतर हर्षाली चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या चित्रपटानंतर तिने अर्जुन रामपालसोबत ‘नास्तिक’ चित्रपटामध्ये काम केले होते.

विशेष म्हणजे ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आलेल्या पाच हजार मुलींपैकी हर्षाली मल्होत्राची निवड झाली होती. मूक मुलगी म्हणून तिच्या कामगिरीचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.

यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘कुबूल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच तिने ‘फेअर अँड लव्हली’, ‘नाशपाती’, ‘एचडीएफसी बँक’,  ‘हॉर्लिक्स’ आणि ‘ऐस’ यांसारख्या अनेक ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’

हे देखील वाचा