Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘बजरंगी भाईजान’मधील ‘मुन्नी’ झालीय १३ वर्षांची; पण आईने केकवर केले ३१, व्हिडिओ होतोय व्हायरल

‘बजरंगी भाईजान’मधील ‘मुन्नी’ झालीय १३ वर्षांची; पण आईने केकवर केले ३१, व्हिडिओ होतोय व्हायरल

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात ‘मुन्नी’ हे पात्र साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे हर्षाली मल्होत्रा. छोटी असणारी मुन्नी आता बरीच मोठी झाली आहे. ती सोशल मीडियावर देखील इतर स्टारप्रमाणे मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याची एकही संधी सोडत नाही. हर्षाली गुरुवारी (३ जून) तिचा 13 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. परंतु या व्हिडिओमध्ये हर्षाली सोबत जे काही होत ते खूपच मजेशीर आहे.

अगदी कमी वयात लोकप्रियतेच्या झोतात असलेली हर्षाली सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओने धुमाकूळ घालत असते. तिने जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती केक कापताना दिसत आहे. तिच्या या वाढदिवसाच्या केकवर 13 क्रमांकाची मेणबत्ती दिसत आहे. परंतु तिची आई 13 चे उलटे 31 असे करते. हे पाहून हर्षालील खूप राग येतो. तिच्या चाहत्यांना तिचा हा मजेशीर व्हिडिओ खूपच आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने कमेंट करून ‘जिओ हजारो साल’ हे गाणे डेडिकेट केले आहे, तर दुसऱ्या एका युजरने तिला चित्रपटात बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या आधी देखील हर्षालीचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण त्यातील तिचा ‘सजना वे सजना’ या गण्यावरील डान्स व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला होता. या व्हिडिओमधील तिच्या डान्स स्टेप्स सोबतच तिचे चाहते तिच्या सध्या लूकचे देखील कौतुक करत होते. तिच्या या व्हिडिओला 15.6 मिलियन पेक्षाही अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली होती की, “आगामी सुपरस्टार तूच आहेस.” दुसऱ्या एका युजरने लिहिले होते की, “सराव कर यापेक्षाही छान करशील.”

हर्षाली 2014 मध्ये आलेला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. कबीर खान यांनी बजरंगी भाईजान या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि हर्षाली सोबत करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे देखील होते. पाकिस्तानमधून आलेल्या लहान मुलीला तिच्या मायदेशी पोहोचवण्यासाठी सलमान खान त्याच्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानमध्ये कसा जातो, ही कहाणी या चित्रपटातून दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा