बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता, प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. चित्रपटात सर्वांचे लक्ष लहान मुलगी हर्षाली मल्होत्राकडे वेधले गेले. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात ‘मुन्नी’ ची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मुन्नीची भूमिका साकारून हर्षाली एका रात्रीत स्टार झाली.
हर्षाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकताच हर्षालीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओमध्ये हर्षाली खूपच क्यूट दिसत आहे.
व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, हर्षालीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या केसांच्या दोन वेण्या घातल्या आहेत. या लूकमध्ये ती ‘तेरियां मोहब्बतां’ या गाण्यावर अतिशय गोड एक्स्प्रेशन्स देत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हर्षालीने ‘दस की करा’ असे कॅप्शन दिले आहे. हर्षालीच्या व्हिडिओला अवघ्या काही तासांत हजारो लाईक्स मिळाले आहेत. चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि हर्षालीला ‘क्यूट’, ‘ब्युटीफुल’ आणि ‘गॉर्जियस’ म्हणत आहेत.
हर्षालीबद्दल बोलायचे झाले, तर ती २०१२ मध्ये पहिल्यांदा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये सलमान खानसोबतची तिची केमिस्ट्री चांगलीच आवडली होती. यात मुन्नीच्या पात्राने न बोलताही प्रेक्षकांची मने जिंकली होती. हर्षाली यानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नसली, तरी चाहत्यांना तिला चित्रपटांमध्ये पाहण्याची चाहते उत्सुक असतात. हर्षालीचे सध्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
हर्षालीने आपल्या टीव्ही कारकिर्दीची सुरुवात टीव्ही जाहिरातींमधून केली होती. याशिवाय हर्षाली झी टीव्ही आणि लाईफ ओकेच्या शोमध्येही दिसली आहे. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील शाहिदाच्या पात्रासाठी सुमारे १००० मुलींनी ऑडिशन दिली होती, त्यापैकी हर्षालीची निवड झाली.
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातून हर्षालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात हर्षालीचा एकही डायलॉग नव्हता, तरीही तिला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. हर्षाली ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान खान आणि करीना कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मुलाला जामीन न मिळाल्याने नाराज झाली गौरी खान, कारमध्ये रडतानाचा व्हिडिओ व्हायरल