मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपट येतात. काही चित्रपट तर असे असतात, जे येतात कधी आणि जातात कधी हे समजत देखील नाही. परंतु काही चित्रपट असे असतात, जे प्रेक्षकांच्या मनात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे स्थान निर्माण करतात. यातीलच प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात त्याची जागा निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘बकुळा नामदेव घोटाळे.’ मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र येऊन हा आगळा वेगळा प्रयोग केला, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट १२ ऑक्टोबर, २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला मंगळवारी (१२ ऑक्टोबर) रोजी १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त या चित्रपटातील काही कलाकारांनी या चित्रपटातील एक सीन शेअर करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “आज ‘बकुळा नामदेव घोटाळे’ प्रदर्शित होऊन १४ वर्षे झाली. १४ वर्षाच्या वनवास असतो म्हणे, पण मला लाभला तुमच्या सगळ्यांचा अमूल्य सहवास. प्रत्यक्ष रुपात अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्याकडून शिकण्याचा आणि प्रत्यक्ष रुपात तुम्हा रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद. ज्यामुळे आजही, इथून पुढेही तितक्याच किंबहुना त्याहूनही अधिक जोमाने काम करायला मी सज्ज झाली आहे.” (Bakula namdev ghotale movie complete 14 years, siddharth jadhav and sonalee Kulkarni share a post on social media )
सिद्धार्थ जाधवने देखील हाच व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “बकुळा नामदेव घोटाळे. आज नाम्या १४ वर्षाचा झाला. छोटी-मोठी कामं करता करता, मुख्य भूमिका मिळालेलं पहिलं काम, श्रेय अर्थात केदार शिंदे सरांनाच. भरत जाधव सरांची साथ आणि आशीर्वाद आणि सोनाली बरोबर जोडी. सगळंच कसं जमून आलं. अविनाश खर्शिकर सर आणि विजू मामांना मनापासून मिस करतोय. महाराष्ट्रातील तमाम मायबाप रसिकांचे मनापासून आभार.”
यासोबत भरत जाधवने देखील सोनाली कुलकर्णीसोबत या चित्रपटातील एक फोटो शेअर करून लिहिले आहे की, “अमाप प्रेम आणि आनंद दिला या पात्राने.”
‘बकुळ नामदेव घोटाळे’ हा चित्रपट अत्यंत मनोरंजनात्मक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे आहेत. तसेच या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, विजय चव्हाण, कुशल बद्रिके, रेशीम टिपणीस यांसारख्या कलाकारांनी काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘साडी ऋतूने गिफ्ट दिली का?’, मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट
-तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज










