Wednesday, July 3, 2024

कधीकाळी स्वत:ला आरशात पाहिल्यावर रडणारी अविका आज दिसतेय खूपच सुंदर; पाहा तिचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

मनोरंजन क्षेत्रामध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. पुढे त्यांनी बालकलाकार म्हणून जी ओळख निर्माण केली, ती ओळख आज ते मोठे झाल्यावर देखील कायम आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत अनेक बालकलाकार आले .मात्र, काही मोजक्याच कलाकरांना मोठी आणि अविरत अशी प्रसिद्धी प्राप्त झाली. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात ‘छोटी सून’ म्हणून ओळख मिळवलेली लोकप्रिय बालकलाकार म्हणजे अविका गौर. अर्थात आपल्या सर्वांची लाडकी ‘आनंदी’ होय. आपल्या निरागसतेने अविकाने सर्वानाच भुरळ घातली.

बुधवारी (३० जून) हीच अविका तिचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३० जून, १९९७ मध्ये एका गुजराती कुटुंबात अविकाचा जन्म झाला. वयाच्या केवळ ११ व्या वर्षी अविकाने ‘बालिका वधू’ या मालिकेत छोट्या आनंदीची भूमिका निभावली. बालविवाहावर आधारित असलेल्या या मालिकेत अविकाने एका सुनेची भूमिका साकारली होती. या मालिकेतून अविकाने तिच्या अभिनयाने आणि निरागसतेने प्रेक्षकांना तिची दाखल घ्यायला भाग पाडले.

लहान असतानाच मिळालेली प्रसिद्धी, लोकप्रियता वेळेनुसार कमी झाली नाही. मात्र, तिला या क्षेत्रात नवीन काम मिळवण्यासाठी संघर्ष नक्कीच करावा लागला. या संघर्षाबद्दल अविकाने एका सोशल मीडिया पोस्टमधून सांगितले आहे. एक अभिनेत्री असल्यामुळे भाविकाला फिट राहणे खूप आवश्यक होते. मात्र, मधल्या काही काळात ती वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त झाली होती. अविकाने या समस्येवर मात तर केली, पण ही मात वाटते तितकी सोपी नव्हती.

अविकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे साडीतले काही फोटो पोस्ट करत एक मोठी पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहिले होते की, “मला अजूनही आठवते की मागच्यावर्षी एक दिवस रात्री जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा मला रडूच आले. मी जे पाहिले ते मला बिल्कुल आवडले नव्हते. जाड हात आणि पाय, मोठे पोट मला हे सर्व कमी करायचे होते. जर हे थायरॉइड किंवा पीसीओडीमुळे असते तर ठीक आहे, कारण ते माझ्या नियंत्रणाबाहेरचे होते. मात्र, हे होते कारण मी खायचे आणि वर्कआऊट करत नव्हते म्हणून. आपल्या शरीराला काळजी खूप आवश्यक आहे. पण दुर्दुवाने मी माझ्या शरीराचा सन्मान केला नाही. मी स्वतःच एवढे बोलले की, मला बाहेरच्या लोकांची गरजच नाही पडली. मग एक दिवस मी ठरवले की मी वजन कमी करणार. सुदैवाने मला माणसं देखील योग्य भेटत गेली. मी योग्य गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मला मार्गदर्शन करणारे अनेक लोक भेटले. आज सकाळी मी स्वतःला आरशात पाहिले आणि मला जाणवले की, आता मला स्वतःवरून नजर फिरवायला त्रास होत नाही.”

https://www.instagram.com/p/B7jK-oUAA_w/?utm_source=ig_web_copy_link

अविकाने ‘बालिका वधू’ नंतर ‘ससुराल सिमर का’ मालिकेत रोलीची भूमिका निभावली होती. या मालिकेतही तिला तुफान लोकप्रियता मिळाली. आज अविकाने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना आवाहन केली की तिला गिफ्ट पाठवण्यापेक्षा दान करा. तिच्या या पावलाचे देखील खूप कौतुक होत आहे.

https://www.instagram.com/p/COnSmy9gxRQ/?utm_source=ig_web_copy_link

अविका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच अविकाने सोशल मीडियावर तिचे प्रेम व्यक्त केले होते. ती मिलिंद चंदवानीला डेट करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी अन् स्वप्नीलने शेअर केले अत्यंत रोमँटिक फोटो; पाहायला मिळाली ‘समांतर २’ मधील बोल्ड केमिस्ट्रीची झलक

-बापरे बाप! ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने केली मानधनात वाढ? एका आठवड्यासाठी घेणार ‘इतके’ कोटी

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

हे देखील वाचा