Friday, October 18, 2024
Home कॅलेंडर ज्येष्ठ नायिका सुरेखा सीकरी काळाच्या पडद्याआड! वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ नायिका सुरेखा सीकरी काळाच्या पडद्याआड! वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी टेलिव्हिजन दुनियेतून एक दुःखद घटना समोर आली आहे. ती म्हणजे ‘बालिका वधू ‘ या लोकप्रिय मालिकेतील दादी सा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे शुक्रवारी (१६जुलै) निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी मुंबईमध्ये शेवटाची श्वास घेतला आहे. दुसरा ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्या या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या संपूर्ण परिवारावर तसेच त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुरेखा सीकरी यांचा जन्म १६ एप्रिल १९४५ रोजी झाला होता. त्यांनी १९७८ साली ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा एक पॉलिटिकल ड्रामा होता. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी तीन वेळा उत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत. ‘तमास’ (१९८८), ‘ममो’ (1995) आणि ‘बधाई हो’ (२०१८) या चित्रपटासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

त्यांच्या मृत्युने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे. त्यांचे कुटुंब शोक व्यक्त करत आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा