आज प्रतिभावान अभिनेत्री सुरेखा सिक्री यांची जयंती. त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. मात्र त्यांची बालिका वधू मालिकेतील ‘दादीसा’ ही भूमिका अमाप गाजली. कठोर, शिस्तप्रिय मात्र तरीही प्रेमळ असणारी ही दादी खूपच भाव खाऊन गेली. योगायोग म्हणावा की नशीब या मालिकेत काम करणाऱ्या तीन मुख्य कलाकारांनी अशीच आपल्या सर्वांमधून अचानक एक्सिट घेतली आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने आणि २०१६ मध्ये टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या बातमीने दिला होता. हा निव्वळ योगायोग आहे की, सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जी या मालिकेमुळे ओळख मिळाली. या जोडीतील प्रत्युषा बॅनर्जी तर आधीच हे जग सोडून गेली आता सिद्धार्थ शुक्ला देखील जग सोडून गेला आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी ‘बालिका वधू’ मधील आजीची भुमिका साकारणाऱ्या ‘सुरेखा सिकरी’ यांचेही निधन झाले होते.

‘बालिका वधू’ या मालिकेचे नाव घेतले की डोळ्यासमोर सिद्धार्थचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा जेव्हा या शोचा विषय निघत तेव्हा तेव्हा प्रत्युषा बॅनर्जी आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे नाव येतेच येते. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी आता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. जरी दोन्ही कलाकार खूप कमी काळासाठी या मालिकेत दिसले. तरी, त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. या मालिकेत प्रत्युषा बॅनर्जीने मोठ्या ‘आनंदी’ची आणि सिद्धार्थ शुक्लाने ‘शिव’ची भूमिका निभावली होती. सुमारे आठ वर्षांपूर्वी ‘बालिका वधू’ या मालिकेत हे दोघं सोबत झळकले होते.

पाच वर्षापूर्वी जेव्हा बालिका वधू मधील मोठ्या ‘आनंदी’ने म्हणजेच प्रत्युषा बॅनर्जीने गळफास घेत आत्महत्या केली तेव्हा सर्वांचं धक्का बसला. तिने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे, सुरेखा सिक्री म्हणजेच या मालिकेतील ‘दादीसा’ यांनी देखील यावर्षी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला. आता या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र सिद्धार्थ शुक्लाने जगाला निरोप दिला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! टीव्ही जगतातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला देहविक्रीचे रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक










