Saturday, March 15, 2025
Home अन्य बप्पी लहरी यांच्या अंत्यसंस्कारवेळी मुलगी रीमाची रडून रडून झाली वाईट अवस्था, मुलगाही झाला भावुक

बप्पी लहरी यांच्या अंत्यसंस्कारवेळी मुलगी रीमाची रडून रडून झाली वाईट अवस्था, मुलगाही झाला भावुक

गायक बप्पी लहरी यांच्या मृत्युने सगळ्यांना खूप दुःख झाले आहे. सिनेसृष्टीत सगळेजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. संगीता क्षेत्राने एक मोठा गायक आणि संगीतकार गमावला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराच्या बाहेर त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. बप्पी लहरी यांचे पार्थिव पाहून त्यांची मुलगी रीमा हिला सांभाळणे अवघड झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारवेळी जो शेवटचा फोटो समोर आला आहे त्यात रीमा खूप रडताना दिसत आहे.

बप्पी लहरी यांच्या पार्थिवाचे अंत्य संस्कार साठी त्यांच्या घरचे बाहेर आणले गेले. यावेळी त्यांचा मुलगा बप्पा लहरी आणि मुलगी रीमा लहरी दोघेही खूप रडत होते. वडीलांच्या पार्थिवाला खांदा देताना बाप्पा याला शेवटच्या क्षणी वडिलांशी बोलता आले नाही याचे दुःख दिसत होते. (Bappi Lahiri funeral son bappa carries singer mortal remains rema Lahiri break down)

रीमा देखील खूप दुःख होते. तिचे नातेवाईक आणि मित्र तिला आधार देत होते. परंतु वडिलांना आठवून ती भावुक होत होती. बप्पी लहरी यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहिती नुसार त्यांच्या मृत्यू आधी ते शेवटचे त्यांची मुलगी रीमासोबत बोलले होते. रीमा आणि बप्पी यांचे नाते खूप चांगले होते. वडीलांच्या जाण्याने ती तुटून गेली आहे.

बप्पी लहरी यांनी बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यांच्या गाण्यांना नेहमीच एक वेस्टर्न टच होता. त्यामुळे तरुणांना त्यांची गाणी खूप आवडायची.

हेही वाचा :

हे देखील वाचा