Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड बप्पी लहिरी यांच्या आठवणी सांगताना मुलगा बाप्पा लहिरी झाला भावूक, सांगितल्या वडिलांच्या ‘या’ खास आठवणी

बप्पी लहिरी यांच्या आठवणी सांगताना मुलगा बाप्पा लहिरी झाला भावूक, सांगितल्या वडिलांच्या ‘या’ खास आठवणी

हिंदी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांच्या  निधनाने संपूर्ण चित्रपट जगताला मोठा धक्का बसला होता. आपल्या जादुई आवाजाने बप्पी लहिरी यांनी अनेक दशके संगीत क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले होते. १५ फेब्रुवारी २०२२ ला बप्पी लहिरी यांना ह्रदय विकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपुर्ण चित्रपट जगतातून हळहळ व्यक्त केली गेली. त्यांच्या  मृत्यूने बप्पीदांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला होता. आजही त्यांचे अनेक किस्से ते सांगत असतात. अलिकडेच बप्पी लहिरी यांच्या मुलाने त्यांच्या गळ्यातील सोने, आणि चमकदार कपड्यांच्याबद्दल एक चकित करणारा खुलासा केला आहे. 

बप्पी लहिरी हे हिंदी संगीत क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व होते. आपल्या दमदार आवाजाने त्यांनी असंख्य गाणी गायली जी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. बप्पी लहिरी यांच्या गाण्यांइतकीच त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाचीही नेहमी चर्चा रंगत असते. गळ्यात सोने, हातात अंगठ्या आणि ब्रेसलेट सोबत अंगावर चमकदार कपडे असा त्यांचा पेहराव नेहमीचा चर्चेचा विषय असतो. त्यांच्या जाण्याने एका सोनेरी पर्वाचा शेवट झाला अशीच प्रत्येकाची भावना होती.त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी सांगताना लहिरी कुटुंबीय आजही भावूक होतात. अलिकडेच त्यांचा मुलगा बाप्पा लहिरीने अनेक आठवणी सांगितल्या होत्या. एका मुलाखतीत बोलताना बाप्पा लहिरी म्हणाला की, “त्यांच्याबद्दलची माझ्या मनात असलेली सगळ्यात गोड आठवण म्हणजे ते नेहमी कामात व्यस्त असायचे. त्यांच्याभोवती नेहमीच लोकांची गर्दी पाहायला मिळायची. त्यांच्या कपड्यांची, गॉगलची नेहमी चर्चा पाहायला मिळायची. मी जेव्हा ८ महिन्यांचा होतो तेव्हा त्यांनी मला विमानात बसवले होते. कामात व्यस्त असूनही ते आम्हाला वेळ द्यायचे,माझ्या शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहायचे ही त्यांच्याबद्दलची सगळ्यात कौतुकास्पद बाब आहे.”

आपल्या वडीलांच्या आठवणी सांगताना तो पुढे म्हणाला की, “ते नेहमी एका स्टुडियोमधून दुसऱ्या स्टुडिओत धावत असायचे, मात्र त्यांनी कधीही आम्हाला व्यस्त असल्याची कारणे दिली नाहित. त्यांनी नेहमीच आपल्या कुटूंबाला पहिले प्राधान्य दिले. पप्पा लहान होते तेव्हापासून त्यांना Elvis Presley आवडायचे. तो सोन्याची चैन वापरायचा तेव्हापासून त्यांनीही चैन घालायला सुरूवात केली. त्यामुळेच त्यांनी असे चमकदार कपडे घालायला सुरूवात केली होती.” त्यांच्या या नेहमी गॉगल घालण्याच्या सवयीने मला शाळेतील मुले चिडवायची अशी आठवणही त्याने यावेळी बोलून दाखवली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा