Tuesday, July 9, 2024

Bappi Lahiri | बप्पा लहरीने केला वडिलांच्या सोने व सनग्लासेस घालण्यामागचा खुलासा, सांगितले ‘असे’ काही

बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून गायकाचे चाहते अजूनही बाहेर आलेले नाहीत. ‘डिस्को किंग ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेले बप्पी दा यांचे वयाच्या ६९व्या वर्षी, १५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यानंतर १७ फेब्रुवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बप्पी दा यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बप्पी लहरी यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा बप्पा लहरी याने पहिल्यांदाच वडिलांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

वडील बप्पी लहरी यांच्याबद्दल बोलताना बप्पा लहरी खूप भावूक झाला. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, बप्पा लहरीने त्याच्या वडिलांशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली आणि सांगितले की, त्याचे वडिलांशी कसे नाते होते. वडिलांसोबतच्या बालपणीच्या आठवणी सांगताना बप्पा म्हणाला, “आमच्यासाठी तो खूप कठीण काळ होता. पण, बाबांनी त्यांचे आयुष्य साजरे केले. याच कारणामुळे मी आज तुमच्याशी बोलत आहे.” (bappi lahiri son bappa lahiri talks about his look memories and more)

तो पुढे म्हणतो, “माझ्या मनात पहिली गोष्ट येते की, त्यांचं कामात व्यस्त असणं आणि लोकांचं त्यांच्या अवतीभोवती फिरणं. ते जे कपडे घालायचे, त्यांचे सनग्लासेस वगैरे. जेव्हा मी ८ महिन्यांचा होतो, तेव्हा त्यांनी मला फ्लाइटमध्ये नेले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा ते मला बाहेर घेऊन गेले होते. एवढे व्यस्त असतानाही ते माझ्या शाळेच्या ऍन्युअल डेच्या दिवशी नेहमी हजर असायचे.”

‘ते एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत धावायचे. पण, मी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांची गरज होती, तेव्हा ते तिथे होते आणि त्यांनी आम्हाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. बाबा लहानपणापासूनच एल्विस प्रेस्लीला पसंत करायचे. त्यांनी एल्विस प्रेस्लीला सोन्याची साखळी घातलेली पाहिली आणि त्यांनीही ती घालायला सुरुवात केली. पण, त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची होती. आणि मला वाटते की, असाच त्यांच्या मनात आकर्षक कपडे आणि सनग्लासेसचा विचार त्यांच्या मनात आला असावा.”

बप्पा लहरी पुढे म्हणाला, “मी तुम्हाला सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांच्या चष्म्यामुळे माझी शाळेत खूप टिंगल केली जायची. इतर विद्यार्थ्यांनी मला अनेकदा विचारले की, ते दरवेळेस सनग्लासेस का घालतात. हे सगळे सोपे नव्हते. मला आठवतंय मी त्यांना त्याबद्दल सांगितलं होतं. पण, त्यांना काही अडचण नव्हती. त्यांना आवडेल तेच काम ते करत असत. ही त्यांची खास शैली होती.”

बप्पी यांनी ४८ वर्षे इंडस्ट्रीवर राज्य केले आणि त्यांच्या कारकिर्दीत ५००० हून अधिक गाणी संगीतबद्ध केली. १९८६ मध्ये त्यांनी केवळ एका वर्षात ३३ चित्रपटांसाठी १८० गाणी रेकॉर्ड केली होती. या कामगिरीबद्दल त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा