Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड जेव्हा राजकुमार यांनी बप्पी लहिरींच्या दागिन्यांवरून केली होती चेष्टा म्हणाले, ‘फक्त मंगळसूत्राची कमी आहे’

जेव्हा राजकुमार यांनी बप्पी लहिरींच्या दागिन्यांवरून केली होती चेष्टा म्हणाले, ‘फक्त मंगळसूत्राची कमी आहे’

दिग्गज संगीतकार बप्पी लहरी यांनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) या जगाचा निरोप घेतला. त्यांची गाणी नेहमीच आपल्यात अजरामर राहणार आहेत. ते त्यांच्या गाण्यांमुळे जेवढे लोकप्रिय होते तेवढेच ते त्यांच्या सोन्यामुळे देखील लोकप्रिय होते. जर कोणीही जास्त सोने घातले, तर त्याची तुलना बप्पी लहरी यांच्यासोबत केली जात होते. सोन्याबाबत असाच एक किस्सा त्यांच्या आयुष्यात देखील घडलं आहे. यामुळे अभिनेता राजकुमार चर्चेत आले होते. राजकुमार म्हणाले होते की, केवळ मंगळसूत्राची कमी आहे, ते पण घाला.

बप्पी लहरी यांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड होती. यावरूनच राजकुमार यांनी बप्पी लहरींची मस्करी केली होती. झाले असे होते की, त्यांच्या सवयीप्रमाणे बप्पी एकदा एका पार्टीमध्ये सोने घालून गेले होते. हे पाहून राजकुमार चकित झाले होते. ते म्हणाले की, “वाह किती एका पेक्षा एक सुंदर दागिने घातले आहेत. फक्त यात मंगळसूत्राची कमी आहे ते पण घातले असते.” असे म्हटले जाते की, राजकुमार यांनी केलेली ही मस्करी बप्पी लहरी यांच्या मनाला लागली होती. परंतु तेव्हा त्यांनी चेहऱ्यावर काहीही न दाखवता हसले होते. (Bappi Lahiri’s interesting kissa with Rajkumar about gold)

बप्पी लहरी यांचे निधन मुंबईमधील क्रिटीकेअर रुग्णालयात झाले. काही दिवसांपूर्वी ते कोरोना संक्रमित झाले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा दुःखद धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा