सुनील पाल हे एक लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडीयन आहेत. आतापर्यंत ते त्यांच्या कलेतून सर्व प्रेक्षकांना हसवत आले. तसेच या कलाकाराला अनेक लोक मानतात. कारण सुनील यांनी त्यांच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र ते सध्या एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान एका विचित्र परिस्थितीत सापडले. एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना मंचावर बोलावले जाते, परंतु जेव्हा ते प्रेक्षकांशी बोलण्याचा जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा आयोजक त्यांना माईक देण्यास स्पष्टपणे नकार देतात. ही घटना सोशल मीडियावर झटपट चर्चेचा विषय बनली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सुनील पाल (pal)यांना मंचावर बोलावून फुलांचा गुच्छ दिला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सन्मान मिळाल्यानंतर, जेव्हा सुनील पाल आभार मानण्यासाठी पुढे येतात, तेव्हा आयोजक त्यांना माईक देण्याऐवजी त्यांच्या जागेवर परत जाण्याचा इशारा करतात. सुनील पाल गोंधळलेले दिसतात आणि आयोजकांना किमान आभार मानण्याची संधी देण्याची वारंवार विनंती करतात, परंतु आयोजक त्यांच्याकडे मनने ऐकत नाहित. आणि त्यांना मंच सोडण्यास सांगत राहतात.
या घटनेवर आता नेटकऱ्यांनी आणि सुनील पाल यांच्या चाहत्यांनी आयोजकांच्या वागणुकीचा तीव्र निषेध केला आहे. लोकांच्या मते, एका कलाकारासोबत अशा प्रकारची वागणूक अत्यंत उद्धटपणाची आणि अनादरपूर्ण आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “एकतर त्याला आमंत्रित करू नका, किंवा आमंत्रित केल्यास त्याचा आदर करा. काहींनी याला क्रूर अपमान म्हटले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










