Sunday, June 8, 2025
Home अन्य सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

टीव्हीवर असे अनेक शो असतात, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. मग त्यातील काही शो हे वादग्रस्त असूनही प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. असाच एक शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. विशेष म्हणजे बिग बॉसची लोकप्रियता एवढी जास्त आहे की, आतापर्यंत या शोचे १४ पर्व झाले आहेत. तसेच शनिवारी (२ ऑक्टोबर) ९.३० पासून ‘बिग बॉस १५’चे पर्वही सुरू होत आहे. यावेळीही शोचा होस्ट सलमान खान स्पर्धकांना धडा शिकवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.

दुसरीकडे या शोचे चाहते हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत की, या शोमध्ये यावेळी नवीन काय असेल? घर आतमधून कसे दिसत असेल? या सर्व प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला मिळणार आहेत. या सर्व गोष्टींबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया… (BB15 House Inside Video Viral See Salman Khan Hosted Show View)

‘बिग बॉस १५’ शो सुरू होण्यापूर्वीच निर्मात्यांनी घरातील प्रत्येक कोपऱ्याचे दर्शन घडवले आहे. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, यावेळी पूर्ण थीम जंगलावर आधारित आहे. घरातील प्रत्येक कोपऱ्याला जंगलाचे लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरात केवळ झाडे आणि रोपटेच नाही, तर डेकोरेशनही खूपच शानदार करण्यात आले आहे. घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या शोची क्रेझ कमालीची वाढली आहे.

चाहत्यांसाठी पर्वणीचा विषय म्हणजे ‘बिग बॉस १५’मध्ये यावेळी बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. ‘बिग बॉस १५’पूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’ सुरू झाले होते, ज्याची विजेता दिव्या अग्रवाल होती. आता बिग बॉस ओटीटीचे ३ खेळाडू शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट ‘बिग बॉस १५’चा भाग बनण्यास सज्ज झाले आहेत. दुसरीकडे ‘बिग बॉस १४’चे पर्व टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने जिंकले होते, तर ‘बिग बॉस १३’चे पर्व दिवंगत सिद्धार्थ शुक्लाने जिंकले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

हे देखील वाचा