Monday, July 1, 2024

तब्बल सात वर्षांनी समोर येतेय ‘त्या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या मृत्यूची गुढ कथा, बीबीसी युकेची डॉक्युमेंटरी प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या निधनानंतर ७ वर्षांनी आता बीबीसी वाहिनीने ‘डेथ इन बॉलिवूड’ हा माहितीपट प्रसिद्ध केला आहे. हा माहितीपट फक्त यूकेमध्येच प्रदर्शित झाला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा माहितीपट ३ भागांमध्ये दाखवला गेला आहे.

माध्यमांनुसार माहितीपटाचा पहिला भाग ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला. त्याच वेळी, लगेच इतर दोन भागदेखील प्रदर्शित झाले. या माहितीपटात, तपासणी दरम्यान समोर आलेला जिया खानच्या मृत्यूबद्दलचा सिद्धांत दाखवला गेला आहे.

आपण जर थोडंसं आठवण्याचा प्रयत्न कराल तर आपल्या लक्षात येईल की, जिया खान २०१३ मध्ये संशयास्पद परिस्थितीत मुंबईतील तिच्याच घरी मृत अवस्थेत आढळली होती. मुंबई पोलिसांसह सीबीआयनेदेखील या प्रकरणाला आत्महत्या म्हटलं होतं.

त्याचवेळी, जीयाची आई सतत तिचा खून झाला असल्याचं सांगत होती. या माहितीपटमध्ये जिया खान केससंदर्भात बऱ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. या प्रकरणात जियाच्या आईच्या तिला न्याय मिळण्याची मागणी केली होती

या माहितीपटाबद्दल सोशल मीडियावर लोक खूप निराश दिसत आहेत. लोकांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित करून आश्चर्य व्यक्त केले आहे. लोक म्हणतात की सूरज पांचोली या माहितीपटाचा एक भाग कसा असू शकतो याबद्दल त्यांना आश्चर्य वाटत आहे.

https://twitter.com/Sandi_Radio/status/1348769804413505536?s=19

जिया खानच्या निधनानंतर तिचा प्रियकर सूरज पांचोलीला या प्रकरणात प्रमुख संशयित म्हणून पाहिले गेले होते. परंतु अजूनही त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. असं असलं तरीही जियाच्या मृत्यूसाठी जियाच्या कुटुंबीयांनी अजूनही त्यालाच जबाबदार धरले आहे. एका युझरने ट्विटरवर लिहिले की, “सूरज पांचोली आणि आदित्य पांचोली यांनी या माहितीपटात आपल्या मुलाखतींना परवानगी दिल्याबद्दल मला आश्चर्य वाटले.”

त्याचवेळी एका दुसर्‍या युझरने लिहिले, “हा माहितीपट बॉलिवूडचा भयावह चेहरा दाखवतो ज्याबद्दल लोकांना जाणीव असणे आवश्यक आहे. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण अजूनही अडकलेले आहे. या प्रकरणावर सतत बोलणारे लोक न्यायाची आशा निर्माण करतायत.”

हे देखील वाचा