Saturday, June 29, 2024

अय्यो! दीपिकाची इच्छा पूर्ण करणे रणवीरच्या अंगाशी; बेअर ग्रिल्स म्हणाला, ‘तू आता अंडरवेअर काढ’

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. आता तो चर्चेत आलाय ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या शोमुळे. नुकताच तो या शोमध्ये दिसला. यादरम्यान त्याने तब्बल ३६ तास आपला जीव मुठीत घातला. जसे की, रणवीरने सांगितले आहे की, तो या शोमध्ये फक्त पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासाठी सर्बिका रमोंडा हे खास फूल घेण्यासाठी आला होता. मात्र, दीपिकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या अंडरवेअरचाही त्याग केला होता. यावेळी बेअर ग्रिल्स याने रणबीरला म्हणाला की, त्याची अंडरवेअर खूप कामाची गोष्ट आहे.

बेअर ग्रिल्सने मागितली रणवीरची चड्डी
बेअर ग्रिल्स (Bear Grylls) याच्या या शोमध्ये दीपिकासाठी फुल घेण्यासाठी जाणे रणवीरला खूपच महागात पडले. सर्बिका रमोंडा (Serbica Ramonda) या फुलापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूपच खतरनाक होता. रणवीर आणि बेअर ग्रिल्स (Ranveer Singh And Bear Grylls) यांच्या वाटेत एक अंधारमय गुहादेखील आली. मात्र, त्यामध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे याचा जुगाड करण्यासाठी बेअरला मशालीप्रमाणे काहीतरी बनवायचे होते. त्याने एक मोठी काटी घेतली आणि त्यासाठी कपडा शोधू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

यावेळी त्याला दुसरा कोणताही कपडा सापडत नसल्याने त्याने रणवीरला त्याला त्याची अंडरवेअर मागितली. यावेळी रणवीरने त्याला अंडरवेअर देण्यास नकार दिला. यावर बेअर ग्रिल्स त्याला मजेशीर अंदाजात म्हणाला की, “चड्डी तर मी काढणारंच.” यादरम्यान त्यांच्यात खूपच मजा-मस्तीही पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

जाळली रणवीर सिंग याची अंडरवेअर
मात्र, यानंतर रणवीरने त्याची अंडरवेअर काढून बेअरला दिली. रणवीरची चड्डी मिळाल्यानंतर, बेअर म्हणाला, “मी तुझ्या चड्डीने संपूर्ण जंगल जाळून टाकू शकतो.” रणवीरची चड्डी लवकर जळते असे सांगून बेअरने कपड्याला लिप बाम लावला आणि चाकूच्या पाठीमागील बाजूस ठिणगी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी आग पेटली आणि बेअरने रणबीरला सांगितले, “तुझ्या चड्डीने जीव वाचवला.”

महत्त्वाचं म्हणजे, हे दोघेही जेव्हा गुहेत गेले, तेव्हा त्यांना साप दिसला. त्यावेळी रणवीर सिंग ओरडला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

वयाच्या ५६व्या वर्षीही ‘फिट अँड फाईन’ आहे शाहरुख, बाथरूममध्येच शर्टलेस झाला ‘किंग खान’

जॅकलिन फर्नांडिज करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, सिनेमाचा पोस्टर रिलीज

अनुपमा रणबीरला देतेय बाबा बनण्याचं ट्रेनिंग, व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

हे देखील वाचा