Saturday, June 29, 2024

भाळणे तुझ्या सौंदर्याला ही साहजिकच गोष्ट खरी! गुलाबी साडीत मराठमोळ्या प्राजक्ता माळीने चाहत्यांना केले मंत्रमुग्ध

प्राजक्ता माळी ही मराठी करमणूक उद्योगातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग असणारी अभिनेत्री, फोटोशूट्सने तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून, ती तिच्या उत्कृष्ट फॅशन स्टेटमेंटद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर ती दरदिवशी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

आपणा सर्वांना माहित आहे की, प्राजक्ता साड्यांवरील तिच्या प्रेमासाठी ओळखली जाते. ती साडी परिधान करून नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ताने सुंदर साडीतील तिचा लुक चाहत्यांसमोर सादर केला आहे. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची भरतकाम असलेली साडी परिधान केली आहे. यासह तिने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केले आहे. फोटोतील तिची सुंदरता पाहून प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडत आहे.

प्राजक्ताने हे ग्लॅमरस फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पिंजरे की मारी हिरनी बेचारी…शेरो से जाके नैना मिलाये रे..मन भोला तन बेईमान हाय रे!” फोटोसह कॅप्शनही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट’ मध्ये दिसली होता. ज्यामध्ये सुव्रत जोशी आणि रोहित हळदीकर हेही मुख्य भूमिकेत दिसले होते.

हे देखील वाचा