जीवनात येणारे नैराश्य आणि चिंता यांपासून सुटका मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण थेट जीवाशी तडजोड करणे हा पर्याय असत नाही. सर्वसामान्य माणसापासून ते बॉलीवूडच्या कलाकार यांनीही आयुष्यात नैराश्याचा सामना केला आहे. बॉलीवूड जग हे दिसायला जितके सुखी आणि सुखी दिसते, तितके ते प्रत्यक्षात आहे असं बिलकूल नाही. तिथे खऱ्या आयुष्यात काम करणाऱ्या लोकांचे जीवन हे फार अंधारमय आणि चिंतेने भरलेले आहे. इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच, लॉबी कल्चर आणि अशा आणखी अनेक मुद्द्यांवर याआधीही चर्चा झाल्या आहेत.
मात्र, ज्याच्या वाट्याला या सर्व गोष्टी आल्या त्यातील अनेकांनी धैर्याने सामोरे जाण्याऐवजी नैराश्येपोटी स्वताःचे जीवन संपवून टाकले आहे. तर काही कलाकार हे अद्या विवादित म्हणून राहिले आहेत. आज आपण अशा काही बॉलीवूड कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नाव पद, पैसा आणि प्रेम अशा अनेक करणांमुळे चर्चेत आले. काहींची नावे वाईट कृत्यात समावेश असल्याच्या आरोपामुळे बदनाम झाले. यातील काहींनी पुढे जाऊन स्वतःचे जीवन नैराश्य, चिंता अशा शुल्लक कारणांसाठी संपवले.
१) संदीप नाहर
एम. एस. धोनी आणि केसरी सारख्या नामांकित चित्रपटातून जनतेसमोर आलेला संदीप नाहर याने दिनांक १५ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येच्या काही वेळापूर्वी त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ आणि चिट्टी सादर केली होती. ज्यात त्याच्या मृत्यचे कारण त्याने आपल्या बायकोला ठरवले होते. आणि यासोबतच अनेक गोष्टींचा उलगडा देखील त्याने त्यात केला.
२) एश अन्सारी
‘चलते चलते’ आणि ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात झळकणारी अभिनेत्री एश अन्सारी हिला दोन महिलांसोबत जोधपुरच्या एका हॉटेल मधून पोलिसांनी रॅकेट चालवत असलेल्या आरोपाखाली पकडले होते. यात एकूण तीन महिलांचा समावेश होता.
३) श्वेता बासू प्रसाद
‘कहाणी घर घर कि’ आणि दक्षिणात्य चित्रपटात झळकलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिला २०१४ साली हैदराबादच्या एका हॉटेलमधून रेक्स रॅकेट चालवत असलेल्या आरोपाखाली पकडले गेले होते.
४) मोनिका बेदी
बॉलीवूड अभिनेत्री मोनिका बेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांच्या रिलेशनची चर्चा खूप वेळा झाली होती आणि त्यांनी १९९९ मध्ये लग्न सुद्धा केले होते. काही वर्षांनंतर तिला विदेशातून अटक करण्यात आली. अबू सालेम याच्या मदतीने बनावट पासपोर्ट आणि कागदपत्रे बनविल्याचा आरोप तिच्यावर लावला गेला होता ज्यामुळे तिला अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. परंतु नंतर तिच्या चांगल्या वर्तनामुळे तिची शिक्षा कमी करण्यात आली.
५) ममता कुलकर्णी
करण अर्जुन आणि पुलिसवाला गुंडा या प्रमुख चित्रपटात झळकलेली ममता कुल्कारी हिने अंडरवर्ल्ड डॉन विकी गोस्वामी सोबत लग्न केले. लग्नाच्या काही वर्षांनतर तिचे नाव अमलीपदार्थ तस्करी करणाऱ्या लोकांसोबत जोडले गेले. आपल्या पतीसोबत तिने अनेक बेकायदेशीर कामे सुद्धा केल्याची माहित समोर आली आहे.
६) संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचे नाव दाउद इब्राहीम, अबू सालेम आणि अनिस इब्राहिम सारख्या अनेक अंडरवर्ल्ड गुंड्यांसोबत जोडले गेले. मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त याचा सहभाग असून त्यावेळी त्याला तुरुंगवासाच्या फेऱ्या देखील माराव्या लागल्या.
७) मंदाकिनी
राम तेरी गंगा मेली या चित्रपटात झळकलेलली अभिनेत्री मंदाकिनी आणि दाउद इब्राहिम यांच्या अफेयरची चर्चा अधिक रंगली होती. क्रिकेट सामन्यात दोघांना बऱ्याच वेळा आनंद घेतानाचे चित्र देखील समोर आले होते. बोललं जाते कि दाउदच्या दबावामुळेच मंदाकिनी हिला ऋषी कपूर यांनी त्याच्या चित्रपटात घेतले होते.
८) मिका सिंग
सन २००६ मिका सिंगला राखी सावंत हिला जबरदस्ती नशेमध्ये कीस करण्याच्या आरोपाखाली राखीने त्याच्यावर खटला दाखल केली होता. मिका सिंग याच्या वाढदिवसाच्या दिवशी घडली असून केक कापल्यावर ही घटना घडली होती.
९) आदित्य पांचोली
बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली याच्यावर त्याच्या कामवाली बाईने बलात्कार करण्याचा आरोप लावला होता. त्यावेळी पूजा बेदी सोबत तो रिलेशनमध्ये होता. परंतु या घटनेनंतर पूजाने त्याच्या सोबत ब्रेकअप केले, एवढेच नाही तर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनावत हिच्यासोबत देखील तो रिलेशनशिप मध्ये होता. त्यांनतर त्याच्यावर गैरवर्तन आणि हात उठवल्याचा आरोप केल्यामुळे तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले.
१०) शायनी अहुजा
गँगस्टर आणि भूल भुलैया यांसारख्या चित्रपटात झळकलेला शाइनी अहुजा यांच्यावर त्याच्या घरकाम करणाऱ्या बाईने बलात्काराचा आरोप लावला होता आणि तो खरा देखील ठरला. त्यामुळे त्याला खूप वर्षे तुरुंगवास भोगावा लागला त्यांनतर त्याचे बॉलीवूडमधील करियर पूर्णतः संपुष्टात आले.
११) अमन वर्मा
बोलीवूस अभिनेता आणि होस्ट अमन वर्मा हा एका स्टिंग ऑपरेशन् मध्ये एका मुलीवर लैगिक छळ करताना दिसला. इंडिया टीव्ही च्या “मोस्ट वॉन्टेड” या शोमध्ये स्पष्ट दाखवले गेले कि तो एका मुलीला फसवत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर या अभिनेत्यावर कास्टिंग काऊच च्या आरोपाचा ठपका बसला,
१२) शक्ती कपूर
सन २००५ मध्ये बॉलीवूड अभिनेता शक्ती कपूर हा एका स्टिंग ऑपरेशनमध्ये एका मुलीला फसवून तिच्यावर लैगिक छळ करताना दिसला होता. चित्रपटात काम देण्याच्या उदेशाने त्याने तिला बोलवले होते. हे ऑपरेशन उघडकीस येताच त्याच्या बॉलीवूडमधली त्याची प्रतिष्ठा कमी झाली.
१३) सुशांत सिंग राजपूत
बॉलीवूड अभितेना सुशांत सिंग राजपूत याने १४ जूनला आत्महत्या करून सर्वानाच जबर धक्का दिला होता. त्याने आपल्या मरणानंतर एकही चिठ्ठी देखील सोडली नाही. जेणेकरून त्याच्या आत्महत्येचे कारण शोधता येऊ शकेल. खूप लोकांचे असे म्हणणं होते की, तो अंमली पदार्थांचे सेवन करायचा. पैशांचा वाईट वापर करायचा.
१४) प्रत्युशा बनर्जी
बालिका वधू फेम आनंदी म्हणजेच प्रत्युशाने १ एप्रिल २०१६ ला आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. आपला बॉयफ्रेंड राहुल याच्यावर तिने हा आरोप लावला होता. सोबतच कुटुंबीयांवर देखील तिने या गोष्टीसाठी जबाबदार ठरवले होते. त्यावेळी तिचे वय अवघी २५ होते.
१५) जिया खान
निशब्द, हाउस फुल आणि गजनी या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री जिया खान वयाच्या २५ वर्षी आत्महत्या केली होती. ज्यात तिच्या आईने सुरज पांचोली याच्यावर तिच्या मृत्यूचा आरोप लागला होता.
१६) सिल्क स्मिता
दक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता हिचा मृतदेह ३ सप्टेंबर १९९६ ला तिच्या राहत्या घरी पंख्यावर लटकताना मिळाला. त्यावली ती ३५ वर्षाची होती. पोलिसांनी आत्महत्या प्रकरण सांगून ती केस बंद केली होती.
१७) प्रेक्षा मेहता
क्राईम पेट्रोल, लाल इश्क आणि मेरी दुर्गा सारख्या कार्यक्रमात काम केलेल्या प्रेक्षा मेहता हीने इंदोर मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी तिने एक चिट्ठी देखील सोडली होती त्यात तिच्या आत्महत्येचे मूळ कारण तिने लिहिले होते.
१८) मानमित ग्रेवाल
पापला थकलेला पगार ना मिळाल्या कारणामुळे मानमित ग्रेवाल याने सुद्धा आत्महत्या केली होती. तो खूप हलाखीच्या परिस्थिती मध्ये होता आणि फॉरेन ट्रिप साठी त्यांनी लोन सुद्धा घेतले होते ते चुकते न केल्यामुळे त्याने हा पर्याय निवडला असल्याचे त्याच्या जवळच्या मित्राने सांगितले.
अधिक वाचा
तुम्ही पाहिलेत का? बॉलिवूडमध्ये जुण्या कलाकारांनीही बिंधास्त दिलेत किसींग सीन, बघा व्हिडिओ
‘या’ कारणामुळे सैफ अली खानच्या फॅनने अभिनेत्याला मारले होते बेदम, वाचा तो किस्सा
जॅकी भगनानीसोबतच्या नात्याबद्दल रकुल प्रीत सिंगने केला खुलासा म्हणाली, ‘मला काहीही लपवायचे नाही पण…’