Tuesday, July 9, 2024

बॉलिवूड अन् अंमली पदार्थ प्रकरणांची यादी संपता संपेना, अनेक दिग्गजांनी यापूर्वी खाल्लीये जेलची हवा! वाचा सविस्तर

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गुरुवारी (३ ऑक्टोबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. क्रूझ शिपमध्ये रेव्ह पार्टी चालू होती तिथे तो उपस्थित होता. तपासादरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे आर्यनला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्यन खान व्यतिरिक्त, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडचं नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर या अगोदरही अनेक नामवंत कलाकारांची नावे या प्रकरणात चांगलीच चर्चेत आली आहेत. एक नजर टाकू त्या कलाकारांवर, ज्यांची नावे या प्रकरणात समोर आली होती.

संजय दत्त
बॉलिवूडच्या संजू बाबाने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र अभिनेता त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये व्यावसायिकपेक्षा अधिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिला आहे. साल १९८२ मध्ये संजय दत्तला अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शिवाय त्याला पाच महिने तुरुंगातही राहावे लागले होते. (before aryan khan these bollywood stars also had drug history)

फरदीन खान
अभिनय कारकिर्दीत अपयशी ठरलेला फरदीन खान, त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चांगलाच चर्चेत राहिला आहे. फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान यालाही कोकेन सेवन प्रकरणात अटक झाली होती.

विजय राज
साल २००५ मध्ये, ‘दिवाने हुए पागल’ या चित्रपटाचे शुटिंग दुबईत झाले. मात्र तेथून परताना विजय राज याला विमानतळावर गांजा आणल्याबद्दल पकडले गेले होते.

रणबीर कपूर
तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य होईल की, बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरही या यादीत सामील आहे. अभिनेत्याला अंमली पदार्थ सेवन प्रकरणात पकडले गेले होते.

रिया चक्रवर्ती
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अंमली पदार्थांची प्रकरणं समोर येऊ लागली. या प्रकरणात अभिनेत्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याला अमली पदार्थ पुरवल्याची माहिती समोर आली होती. यासाठी तिला एक महिना तुरुंगवास भोगावा लागला असून, अजूनही तिची केस सुरू आहे.

शौविक चक्रवर्ती
सुशांत सिंग राजपूतच्याच प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनंतर, तिचा भाऊ शौविक याला देखील सुशांतला अमली पदार्थ पुरविल्याच्या आरोपावरून अटक झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा