Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड कौतुकास्पद! पुनीतपूर्वी ऋतिक अन् बिग बींसह ‘या’ कलाकारांनी केलाय नेत्रदान करण्याचा संकल्प

कौतुकास्पद! पुनीतपूर्वी ऋतिक अन् बिग बींसह ‘या’ कलाकारांनी केलाय नेत्रदान करण्याचा संकल्प

कन्नड चित्रपटाचा सुपरस्टार पुनीत राजकुमारने वडील डॉ. राजकुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवून नेत्रदान करण्याची शपथ घेतली होती. पुनीतच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे दान करण्यात आल्याने चार जणांना दृष्टी मिळाली आहे. पुनीत व्यतिरिक्त बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार आहेत. ज्यांनी अंध व्यक्तीला नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार ज्यांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे.

ऋतिक रोशन
ऋतिक रोशन आणि यामी गौतम यांनी २०१७ मध्ये आलेल्या ‘काबिल’ चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्याच्या या व्यक्तिरेखेपासून प्रेरित होऊन ऋतिकने यावर्षी १० जानेवारीला त्याच्या वाढदिवशी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिर खान
आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने ‘शिप ऑफ थिसेस’ या चित्रपटातून प्रेरित होऊन डोळे आणि अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. डोळ्यांव्यतिरिक्त, अभिनेता मूत्रपिंड, यकृत, डोळे, त्वचा, आतडे, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, कर्णपटल आणि इतर सर्व उपयुक्त अवयव दान करणार आहे. आमिरसोबत त्याची माजी पत्नी किरण राव हिनेही अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे.

अमिताभ बच्चन
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे नाव अशा अभिनेत्यांपैकी आहे, जे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी इतरांचे जीवन प्रकाशित करतील. त्यांनी २०२० मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी हे उदात्त पाऊल उचलले. त्यांच्यासोबत जया बच्चन यांनीही अवयवदानासाठी एप्लिकेशन दिले आहे.

जुही चावला
प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाही मृत्यूनंतर तिचे नेत्रदान करणार आहे. जुही मोतीबिंदू शिबिरात पोहोचली होती, जिथे तिने इतरांच्या समस्या जाणून घेऊन हा संकल्प केला आहे.

हेमा मालिनी
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी २००७ मध्ये डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. व्हिजन २०२० ची ब्रँड ॲम्बेसेडर बनल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

ऐश्वर्या राय बच्चन
आपल्या सुंदर डोळ्यांनी लाखो लोकांची मने जिंकणारी ऐश्वर्या राय आपल्या डोळ्यांनी इतरांचेही आयुष्य उजळून टाकणार आहे. ती स्वतः देखील नेत्रदान मोहिमेचा एक भाग आहे आणि अनेक वर्षांपासून इतरांना नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

कपिल शर्मा
कॉमेडीयन कपिल शर्माने २०१७ मध्ये डोळे दान करण्याचा संकल्प केला आहे. २०१७ मध्ये कपिलच्या शोमध्ये राष्ट्रीय अंध क्रिकेट संघाला बोलावण्यात आले होते. दृष्टीहीन टीमशी बोलताना कपिल इतका प्रभावित झाला की, त्याने स्वतःच डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.

सोनाक्षी सिन्हा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही गरजूंना मदत करण्यासाठी डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ साली आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंडियन आयडलच्या सेटवर आलेल्या सोनाक्षीने नेत्रदान करण्याची घोषणा केली, इतरांनाही नेत्रदान करण्याचे आवाहन केले.

याशिवाय दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनीही नेत्रदान केले आहे. शिवाय क्रिती सेनन, रितेश देशमुख, जिनेलिया डिसूझा, सलमान खान, राणी मुखर्जी यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनीही आपले अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा