बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थच्या बहुतेक लिंक अप बातम्या त्याच्या चित्रपटांच्या नायिकेसोबतच आल्या आहेत. दरम्यान तो त्याची ‘शेरशाह’ को-स्टार कियारा अडवाणीला (Kiara Advani) डेट करत होता. त्याचवेळी आता सिद्धार्थ आणि कियाराच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. अशातच जाणून घेऊया, की सिद्धार्थचे त्याच्या कोणकोणत्या को-स्टार सोबत अफेअर होते.
आलिया भट्ट (Alia Bhatt)
साल २०१२ मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारे सिद्धार्थ आणि आलिया, अनेक वर्षे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत होते. मात्र, दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीही बोलले नाहीत. त्याच वेळी २०१७ मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. (before sidharth malhotra kiara advani breakup he had affairs with all costars)
जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)
साल २०१७ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा जॅकलीनसोबत ‘ए जेंटलमन’मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. जॅकलीनसोबतच्या नात्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “जॅकलीन खूप अप्रतिम आहे. मला तिच्यासोबत हँग आउट करायला मजा येते. ‘ए जेंटलमन’ करत असताना आम्ही चांगले मित्र झालो.”
तारा सुतारिया (Tara Sutaria)
तारा सुतारिया आणि सिद्धार्थच्या डेटिंगच्या बातम्या त्यांच्या ‘मरजावां’ चित्रपटादरम्यान सुरू झाल्या होत्या. या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. तारानेही एकदा सांगितले होते की, तिचा सिद्धार्थवर क्रश होता. एका मुलाखतीदरम्यान ताराने सिद्धार्थसोबतच्या तिच्या लिंक अपच्या बातम्यांबद्दल सांगितले की, “ज्या दिवसापासून आम्ही भेटलो, लोक आमच्या केमिस्ट्रीबद्दल बोलत होते. आमच्या चित्रपटासाठी हे चांगले होते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच नाही. आम्ही दोघे शेजारी आहोत आणि अनेकदा एकत्र हँग आउट करतो.”
कियारा अडवाणी
‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियाराची जवळीक वाढू लागली होती. दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असत आणि दोघे अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांनाही आवडते, पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही. त्याचवेळी आता त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










