चित्रपट म्हटले की चित्रपटाचे संगीत आणि गाणी ओघाने येतातच. चित्रपटाचा ट्रेलर आला की, प्रेक्षकांना उत्सुकता असते ती सिनेमातील गाणी कधी प्रदर्शित होतील त्याची. गाणीच सिनेमांचा आत्मा असतात. त्यात जर अक्षयचा सिनेमा असेल, तर त्यातील गाण्यांची एक वेगळीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसते. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह त्याच्या सिनेमातील गाणी ऐकण्यासाठी जास्तच उत्सुक असतात. मागील अनेक दिवसांपासून अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ सिनेमा खूपच चर्चेत आला होता.
सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि आज (६ ऑगस्ट) चित्रपटातील पहिले गाणे ‘मरजावा’ प्रदर्शित झाले आहे. सिनेमातील पहिले प्रदर्शित झालेले गाणे एक रोमँटिक गाणे असून, यात वाणी कपूर आणि अक्षय कुमारची सुंदर केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. या दोघांचा या गाण्यातील रोमँटिक अंदाज तुम्हाला नक्कीच प्रेमात पाडेल हे नक्की. या गाण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, गाण्यात दिसणारे रोमॅंटिक सीन्स आणि त्याला उत्तम साथ देणारे लोकेशन्स.
हिंदी, पंजाबी भाषेत असणारे हे गाणे कदाचित पहिलेच असे गाणे असावे, ज्यात अक्षय गळ्यात गिटार घालून गाणे गात असेल. वाणी देखील या गाण्यात अतिशय सुंदर दिसत आहे. अगदी कमी काळात गाण्याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. हे गाणे सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले, ” ‘बेलबॉटम’ मधील माझे सर्वात आवडीचे गाणे ‘मरजावा’ प्रदर्शित झाले आहे. शूटिंगच्या वेळेस हेच गाणे माझ्या डोक्यात सतत सुरु होते.
या चित्रपटात अक्षय एका एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर वाणी त्याच्या पत्नीची भूमिका निभावणार आहे. या दोघांसोबत लारा दत्ता, हुमा कुरैशी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे. लाराचा तर इंदिरा गांधींचा लुक आणि तिचा मेकअप सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहे. हा सिनेमा १९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला