Friday, March 13, 2026
Home अन्य ज्येष्ठ बंगाली अभिनेते इंद्रजित देब यांचे निधन, ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ बंगाली अभिनेते इंद्रजित देब यांचे निधन, ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जेष्ठ अभिनेते इंद्रजित देब यांचे शनिवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बंगाली सिनेमा सृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. ते ७३ वर्षांचे होते.

इंद्रजित बर्‍याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. या व्यतिरिक्त तेआणखी काही गंभीर आजारांशीही झुंज देत होते. घरातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी कोलकाता येथील गोलपार्क या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्याच वर्षी इंद्रजित यांच्या पत्नीचे निधन झाले होते, त्यानंतर इंद्रजित एकटेच राहत होते. इंद्रजित आणि त्यांची पत्नी यांना मूलबाळ नव्हते.

इंद्रजित देब यांनी बंगाली टीव्ही सीरियल ‘तेरो परबोन’ पासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमे व मालिकांमध्ये काम केले.

इंद्रजित देब यांच्या निधनाबद्दल दिग्गज अभिनेते सुदिप्ता चक्रवर्ती यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘बालमित्र आणि नामांकित अभिनेता इंद्रजीत यांच्या निधनाने माझे मन खूप दु:खी झाले आहे.’

हे देखील वाचा