Wednesday, June 26, 2024

व्हायरल झालेल्या नुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या ‘त्या’ बोल्ड व्हिडिओमुळे खासदार ट्रोल

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या राजनेत्या असण्यासोबतच बंगालमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे. नुसरत यांनी अनेक बंगाली हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्या सतत त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे मीडियामध्ये गाजल्या आहेत. त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांच्या अभिनय आणि राजकीय कामाचा ताळमेळ बांधला आहे. दोन्ही क्षेत्रांमध्ये त्या अग्रेसर आहे.

सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असणाऱ्या नुसरत या सतत त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सोशल मीडियावरील त्यांची बोल्ड इमेज नेहमीच त्यांना लाइमलाइट मिळवून देते. त्यांचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोच असतो. अशातच आता त्यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या आणि त्यांचा जोडीदार यश दिसत असून, ते रोमँटिक अंदाजमध्ये आहे. त्यांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nussrat Jahan (@nusratchirps)

नुसरत यांनी यशासोबत या व्हिडिओमध्ये अनेक बोल्ड आणि आकर्षक पोज दिल्या असून, त्यांची केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचा लुकदेखील मादक आणि आकर्षक आहे. त्या विविध ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. यश दासगुप्ता आणि नुसरत यांची जोडी सर्वांचीच लाडकी असून, त्यांचे फोटो नेटकऱ्यांना खूपच आवडतात. असे असले तरी या व्हिडिओमुळे आता नुसरत चांगलीच ट्रोल होत आहे.

जिथे अनेकांना नुसरत आणि यश यांचा हा व्हिडिओ आवडल्याचे चित्र आहेत तर अनेकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केले आहे. एकाने लिहिले, “ही जोडी हिट आहे’, तर दुसऱ्याने लिहिले, “अनेकदा पहिला हा व्हिडिओ’ तर काहींनी त्यांना ट्रोल करत लिहिले, “तुला खासदार कोणी बनवले?’ अजून एकाने लिहिले, “तू नेहमीच विसरते की तू एक खासदार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं’ मिलिंद गवळी यांच्या ‘त्या’ पोस्टने जिंकली नेटकऱ्यांची मने

‘घर बंदूक बिरयानी’मध्ये कलाकरांची पाहायला मिळणार वेगवेगळी शैली; त्यामुळे ही बिर्याणी होणार अधिकच चविष्ट

हे देखील वाचा