Friday, March 29, 2024

भारतातील सामाजिक समस्यांवर आधारित या तीन जबरदस्त डॉक्युमेंटरीज, एकदा पाहाच

खऱ्या घटनांवर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड भारतात अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आता प्रेक्षकांचाही कल याकडे वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत, आज मी तुम्हाला भारतावर आधारित त्या टॉप डॉक्युमेंटरीबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर सहज पाहू शकता.

जय भीम कॉम्रेड
आनंद पटवर्धन दिग्दर्शित,ही डॉक्युमेंटरी मुंबईतील दलित रहिवाशांचे जीवन आणि 1997च्या रमाबाई हत्याकांड यावर केंद्रित आहे. या डॉक्युमेंट्रीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2012मध्ये विशेष ज्युरी पुरस्कार आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2012मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळाला आहे. सिनेप्रेनर या ott प्लॅटफॉर्मवर ही डॉक्युमेंटरी आहे.

इंशाअल्लाह, फुटबॉल
अश्विन कुमार निर्मित, ही डॉक्युमेंटरी एका महत्त्वाकांक्षी काश्मिरी फुटबॉलपटूची कथा सांगते ज्याला परदेशात प्रवास करण्याची परवानगी नव्हती कारण त्याचे वडील 1990च्या दशकात दहशतवादी होते. या डॉक्युमेंटरीने सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नेटफ्लिक्सवर ही डॉक्युमेंटरी उपलब्ध आहे.

चिल्ड्रेन ऑफ द पायरे
राजेश एस. झाला दिग्दर्शित आणि निर्मित ‘चिल्ड्रेन ऑफ द पायरे’ या डॉक्युमेंटरीत गंगेच्या काठावर मणिकर्णिका येथे मृतांचे अंतिम संस्कार करणाऱ्या सात मुलांची कथा आहे. 2008च्या मॉन्ट्रियल वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल आणि लॉस एंजेलिसच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. अमेझॉन प्राइमवर ही डॉक्युमेंटरी तुम्हाला पाहण्यास मिळेल.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका पदुकोणला वयाच्या १८व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांटचा दिला होता सल्ला, अभिनेत्रीने म्हणाली ‘सर्वात वाईट…’
अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण, गोव्याला जाऊन केले फोटो शेअर

हे देखील वाचा